मांडळ येथे वीज पडून तरूण शेतकर्‍याचा मृत्यू

शिंदखेडा तालुक्यात मुसळधार पाऊस
मांडळ येथे वीज पडून  तरूण शेतकर्‍याचा मृत्यू

दोंडाईचा । Dondaicha । श.प्र.

शिंदखेडा तालूक्यातील मांडळ (Mandal) शिवारात वीज पडून (lightning strike) तरुण शेतकर्‍याचा (Young farmer) मृत्यू (killed) झाल्याची घटना दि. 16 रोजी सायंकाळी घडली आहे. हिरालाल पितांबर पाटील (वय 35) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

हिरालाल पितांबर पाटील हा शेतात काम करत असतांना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बैलगाडी घेऊन घराकडे येत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने (Lightning strikes) त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सायंकाळच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील मांडळ, खर्दे, सुराये, मालपूर आदी भागात वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात (started raining with strong winds) झाली. सायंकाळच्या साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे हिरालाल हे बैलगाडी घेऊन घराकडे येत असताना, पाऊस जोराने सुरु झाल्याने लिंबाच्या झाडाखाली उभे असलेला हिरालाल पाटील यांच्या अंगावर वीज कोसळून ते जखमी अवस्थेत जागीच कोसळले.

शेतात वीज पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील शेतकरी घटनास्थळाकडे धावले. त्या ठिकाणी पाटील गंभीर अवस्थेत (critical condition) असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भामरे यांनी मयत घोषित केले. या घटनेची मांडळसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com