चिलाणे सरपंचपदी योगिता गिरासे

चिलाणे सरपंचपदी योगिता गिरासे

आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार

दोंडाईचा Dondaicha । । प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे (Chilane) येथील लोकनियुक्त सरपंच पदमसिंग गिरासे (Publicly appointed Sarpanch Padamsingh Girase) यांचे निधन (Died) झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी दि. 24 रोजी सरपंचपदाची निवडणुकीची (Election of Sarpanch) विशेष सभा घेण्यात आली यावेळी सर्व 11 सदस्य उपस्थित होते. त्यातील 2 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात योगिता प्रविणसिंग गिरासे (Yogita Pravin Singh Girase) यांना 6 मते, प्रतिस्पर्धी उमेदवाराला 4 मते तर 1 मत बाद झाले. योगिता गिरासे यांना सर्वाधीक मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी निवड (Election as Sarpanch) करण्यात आली.

नवनिर्वाचित सरपंच योगिता गिरासे यांचा माजी मंत्री शिंदखेडा मतदारसंघाचे आ. जयकुमार रावल यांच्या जनदरबार कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आ रावल म्हणाले की, चिलाने गावाचा आदर्श गाव म्हणून ओळख आहे परंतु या गावात बाहेरच्या नेत्यांनी येऊन विष पेरून गावाला बदनाम केले होते म्हणून पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये सर्वात आधी सभापती पदाचा मान देऊन गावाचा तालुक्यातील सर्वोच्च पद दिले होते यापुढे देखील गावाच्या विकासासाठी सतत विकास कामे करत राहू, चिलाने गावसह दोंडाईचा ते बेटावद रस्त्याच्या कामासाठी मंत्री पदाच्या काळात कोट्यवधी रुपये निधी आणून सुसज्ज अशा रस्त्याचे काम पूर्ण केले आहे याशिवाय पाणीपुरवठा योजना, गावात विविध ठिकाणी रस्ते अशी नानाविध कामे केली असून अजूनही बराच विकास गावात करायचा असून तो निश्चितच केला जाईल असे आश्वासन आ. रावल यांनी दिले.

यावेळी पंस सभापती अरुण पाटील, ग्रा प सदस्या भागाबाई दशरथ भिल, केवलबाई मगन बागले, लिलाबाई किसन मगरे, सूरज आनंदसिंग गिरासे, पुनम गुलाबसिंग गिरासे, प्रभाकर पाटील, राजाराम पाटील, शिवाजी पाटील, उत्तमराव पाटील, धर्मराज कोळी, राहुल सोनवणे, भालचंद्र पाटील, दिलीप गिरासे, अर्जुन कोळी, हिम्मत भिल आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com