
शिरपूर Shirpur। प्रतिनिधी
श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान, नागेश्वर (Srikshetra Nageshwar) अजनाड बंगला येथे श्रावण महिन्यात (month of Shravan) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दर सोमवारी व इतर दिवशी देखील भाविकांना पावन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी (Shravan Monday) यात्रोत्सव (Yatrotsava) साजरा केला जातो. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांसह दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.
श्री. नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सुरुवातीलाच गोमुख दर्शन होते. याठिकाणी महत्त्वाचे म्हणजे कालसर्प पूजा, नागबली पूजा देखील कमीत-कमी खर्चात केली जाऊ शकते. कारण, आवश्यक अशा सर्व धार्मिक सोयी सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उंबर, महादेव मंदिर, पाणी, गोमुख, गोशाळा अशा सर्व बाबींची उपलब्धता नागेश्वर येथे झाली आहे.
श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मोठ्या प्रमाणात केले असून या ठिकाणी नव्याने श्री गणपती मंदिर, पार्वतीमाता, श्री शंभू महादेव मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषि महाराज, श्री हनुमंत, मोती माता मंदिर निर्माण करण्यात आले आहे. नागेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान असून धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व इतर अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी तसेच आपले नवस फेडण्यासाठी येत असतात. भाविकांनी श्रावण महिन्यात दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.