घर आणि मन जोडण्याचे काम करावे

न्यायमूर्ती विभा कंकणवाडी : कौटुंबिक न्यायालयाच्या इमारत स्थानांतरीत सोहळा
घर आणि मन जोडण्याचे काम करावे

धुळे Dhule । प्रतिनिधी

पती-पत्नींमध्ये (husband and wife) विसंवाद (Disagreement) झाला, की वाद निर्माण होतो. त्यासाठी क्षुल्लक कारणही पुरेसे ठरते. काही वेळेस हे वाद टोकाला जातात. घरात लहान मुले असतील, तर त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतात. अशा परिस्थितीत कौटुंबिक न्यायालयात (family court) येणार्‍या पती- पत्नींचे समुपदेशन (Counseling) करीत त्यांच्यामधील विसंवाद दूर करीत घर आणि मन जोडण्याचे (Connecting home and mind) काम करावे. त्यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) न्यायमूर्ती तथा कौटुंबिक न्यायालयाच्या पालक न्यायाधीश विभा कंकणवाडी (Judge Vibha Kankanwadi) यांनी केले.

कौटुंबिक न्यायालय, धुळेच्या स्थानांतरीत इमारतीचा आभासी उदघाटन सोहळा काल सकाळी धुळे जिल्हा न्यायालयात ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायाधीश न्यायमूर्ती आर. जी. अवचट ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये, सरकारी वकील अ‍ॅड. देवेंद्र तंवर, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती कंकणवाडी म्हणाल्या, कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज कौटुंबिक न्यायालय कायद्याप्रमाणे चालते. यात समुपदेशनावर भर देण्यात येतो. समुपदेशनासाठी तज्ज्ञ समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. या न्यायालयातील न्यायाधीशांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये समाजरचनेत झालेले बदल, आधुनिक विचारसरणी, दोन कुटुंबातील वैचारिक बैठक, शैक्षणिक तफावत यामुळेही पती- पत्नींमध्ये वाद निर्माण होतात. त्यातून विसंवाद निर्माण होतात. पती- पत्नी वादात त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही झळ बसते. मुले असतील, तर गुंतागुंत वाढते. त्यामुळे पती- पत्नींनी मुलांच्या मानसिकतेवर होणार्‍या परिणामांचा विचार करावा. अशा वेळेस त्यांच्यात आणि नातेवाईकांमध्ये सकरात्मक संवाद घडला, तर समेट घडून येवू शकतो. या पार्श्वभूमीवर वकील बांधवांनी वैकल्पिक वाद निवारणाचा प्रयत्न करावा. पती- पत्नींचे वेळीच समुपदेशन झाले, तर त्यांचा संसार सुरळीत होण्यास मदत होईल. कुटुंबातील ज्येष्ठांनीही पती- पत्नींमधील वाद निवारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही अपेक्षा न्यायमूर्ती कंकणवाडी यांनी व्यक्त केली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद म्हणाले, कुटुंब न्यायालयात दोन हजारावर प्रकरणे दाखल आहेत. या न्यायालयास सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. या न्यायालयाच्या आवारात बालकक्षासह विविध सोयी उपलब्ध आहेत. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. वकील संघाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री. उपाध्ये यांनी आभार मानले. यावेळी न्यायाधीश, वकील, बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com