राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी कामाला लागा

वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण, प्रत्येक घरावर झेंडा व दारावर स्टिकर मोहीम
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी कामाला लागा

धुळे । Dhule प्रतिनिधी

राज्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता (One-sided power of the NCP) आणण्यासाठी प्रत्येकाने आजपासूनच कामाला (Work) लागावे. नव्यांना पक्षात सामावून घेताना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यानाही मान-सन्मान द्यावा, पक्ष संघटन (Party organization) वाढविण्यासोबतच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन पक्षाचे जिल्हा निरीक्षक अर्जूनराव टीळे (District Inspector Arjunrao Tille) यांनी येथे केले.

10 जून 2022 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन सोहळा(23rd Anniversary of NCP) ध्वजरोहण करून साजरा करण्यात आला. 10 जून पक्षाच्या 23 वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी भवन, धुळे येथील ध्वजारोहणाचा (Flag hoisting) मुख्य कार्यक्रम पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक अर्जुनराव टिळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन पक्ष संघटन वाढविण्याचे व शरद पवार विचार सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवीण्याचे आवाहन केले.

या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन (Organizing various events) करण्यात येणार असून त्यामध्ये मुख्यता: वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, विविध आंदोलन, निवेदन आदी कार्यक्रमचा समावेश असणार आहे. त्याच पद्धतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घराच्या दारावर पक्षाचे स्टिकर लावले जाणार आहे. प्रत्येक घरावर झेंडा व दारावर स्टिकर ही मोहीम यशस्वीरित्या शहरांमध्ये राबवली जाणार आहे. याची सुरुवात आज करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क अभियान (Nationalist Congress Public Relations Campaign) नुसार ज्या लोकांनी 1999 पासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार व पक्षासोबत आहे, अशा जेष्ठ पदाधिकार्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये एन.सी. पाटील, ए.बी. पाटील, प्रमोद साळुंखे, जोसेफ मलबारी, सलाम मास्टर, नबाब बेग, नंदू येलमामे, शव्वाल अन्सारी, ज्ञानेश्वर पाटील यांचासमावेश आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी केले. यावेळेस ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमाला किरण शिंदे, किरण पाटील, संदीप बेडसे, मंगेश जगताप, भिका नेरकर, अशोक पाटील, एन.सी.पाटील, कमलेश देवरे, वासिम बरी, वासिम मंत्री, सुमित पवार, कैलास चौधरी, एकनाथ भावसार, विजय वाघ, अविनाश लोकरे, सत्यजित सिसोदे, कुणाल पवार, मयूर बोरसे, भोला वाघ, जमीर शेख, वाल्मिक मराठे, एजाज शेख, आमीन शेख, राजेंद्र चौधरी, यशवंत डोमाळे, सोनू घारू, रजनीश निबालकर, जगन ताकटे, संजय सरग, महेंद्र शिरसाठ, उमेश महाले, यशवंत पाटील, राजेंद्र चितोडकर, सरोज कदम, ज्योती पावरा, मीनाक्षी पाटील, तरुणा पाटील, संजीविनी गागृंडे, शकीला बक्ष, जया साळुंखे, ज्योती चौधरी, उषा पाटील, छाया सोमवंशी, सुरेखा नांद्रे, सुषमा महाले, शोभा पाटील, निर्मला शिंदे, हिमानी वाघ, ध्यानेश्वर माळी, मोहन शिंदे, कृष्णा जगताप, दीपक देवरे, राहुल पोळ, भूषण पाटील, कल्पेश बोरसे, विशाल केदार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com