पाण्यासाठी महिलांचा महापालिकेत हंडामोर्चा

भगवती नगरातील महिलांचा संताप मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
पाण्यासाठी महिलांचा महापालिकेत हंडामोर्चा

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील नगावबारीपासून जवळच असलेल्या भगवती नगरातील (Bhagwati Nagar) महिलांनी पाण्यासाठी (Women for water) महापालिकेवर (Municipal Corporation) हंडा मोर्चा (Handa Morcha) आणला. व प्रशासनाला धारेवर धरून शहरात पंधरा दिवसानंतर महापालिका पाणी देते, ते देखील अनेक वेळेस घाण असते.त्यामुळे बालकांसह रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरुनही आमचे हाल का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

देवपुर भागातील नगावबारीपासून जवळच असलेल्या भगवती नगराला समस्यांनी (Problems) घेरले आहे. कॉलनीत गटार नसल्याने सांडपाण्याची समस्या बिकट झाली आहे. आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होतात. वादही होतात,अनेकवेळा निवेदने अर्ज देवून देखील महापालिकेने (Municipal Corporation) गटारींचे काम केलेले नाही. कॉलनतील सांडपाणी महादेव मंदिर आणि हनुमान मंदिराजवळ येवून पोहचते.त्या मंदिराचे पावित्र्य भंग होते. मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होते.

रस्त्यांची अवस्था (condition of the roads) अत्यंत वाईट आहे. नगरसेवकांना वारंवार निवेदन देवून देखील त्यांनी दुर्लक्ष केले आहेे. उन्हाळ्यात पंधरा-पंधरा दिवस महापालिका पाणी (water) देत नाही, जे पाणी मिळते ते देखील घाणेरडे असते. तसे पाणी प्यायले तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. घरातील पुरुष मंडळी बाहेर कामाला जातात त्यामुळे पाण्यासाठी महिलांनाच भटकंती करावी लागते असे गार्‍हाणे मांडत भगवती नगरातील महिलांनी आज महापालिकेवर हंडा मोर्चा (Handa Morcha) काढला.

या मोर्चात प्रिया नागरे, अर्चना कोळी, सुरेखा चौधरी,भाग्यश्री पाटील, सौ.संगीता ठाकुर, शोभा ठाकरे, मिना प्रकाश भामरे, सीमा शिरसाठ, वंदना शिंदे,शोभाबाई फुलपगारे, अनिता बिलाडे, मुक्ताबाई गोविंद माळी आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.