महापालिकेत महिलांचा ठिय्या

महापालिकेत महिलांचा ठिय्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

रमाई घरकुल आवास योजनेचा (Ramai Gharkul Awas Yojana) द्वितीय हप्ता मिळाला नसल्याने लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्वरीत हप्ता मिळावा यासाठी नगरसेविका वंदना भामरे (Corporator Vandana Bhamre) यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत (Municipal Corporation) लाभार्थ्यांनी साखळी उपोषण (Chain fast) सुरु केले आहे. तसेच आयुक्तांच्या (Commissioner) दालनाबाहेर महिलांनी ठिय्या आंदोलन केले.

निवेदनात म्हटले आहे की, रमाई घरकुल आवास योजनेतील (Ramai Gharkul Awas Yojana) लाभार्थ्यांचे मागील पाच महिन्यांपासून लिंटर लेव्हलपर्यंत बांधकाम (Construction) झालेले असून कागदपत्रांची पुर्तता पुर्ण झालेली आहे. तसेच कामांची पाहणी देखील बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेली आहे. परंतू अद्यापही लाभार्थ्यांना द्वितीय हप्ता मिळालेला नाही. कडाक्याचे ऊन पडले आहे. अशा उन्हात लाभार्थी झाडाखाली, रस्त्यावर झोपड्या तयार करुन राहत आहेत.

लहान मुले, शाळेकरी, तरुण-तरुणी उघड्यावर वास्तव करीत आहेत. परंतू प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. वारंवार पाठपुरावा करुन देखील प्रशासन दखल घेत नाही. जुन महिना केवळ एका महिन्यावर येवून ठेपला आहे. त्यानंतर पावसाळा सुरु होईल. पावसाळा सुरु झाल्यास बांधकाम (Construction) करता येणार नाही.

त्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होतील. प्रशासन दखल घेत नसल्यामुळे दि. 28 एप्रिलपासून लाभार्थी साखळी उपोषणास बसले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड उष्मा आहे. उपोषणास बसलेल्या असलेल्या लाभार्थ्यांच्या जीवितास यामुळे धोका आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास महापालिका प्रशासन (Municipal administration) जबाबदार राहिल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नगरसेविका वंदना भामरे यांची स्वाक्षरी आहे.

महापालिकेत आयुक्तांच्या (Commissioner) दालनासमोर नगरसेविका वंदना भामरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेवून रमाई घरकुल आवास योजनेचा दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

ठिय्या आंदोलनात या महिलांचा सहभाग

महापालिकेत करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व प्रभाग क्र. 1 च्या नगरसेविका वंदना भामरे यांनी केले. या आंदोलनात सुनंदा लोटन बोरसे, संजुबाई मधुकर बाविस्कर, विमलबाई सोमनाथ चव्हाण, बेबाबाई अशोक ढिवरे, योगिता कृष्णा बेडसे, सुमनबाई जगन्नाथ शिंदे, रामदास सुनिल सैंदाणे, गौतम मधुकर बाविस्कर, रेखा रामचंद्र वाघ, गीता प्रकाश ब्रम्हाक्षे, सटवाजी रंगनाथ वाव्हळकर, निर्मला यशवंत भामरे, प्रवीण शामराव सोनवणे, राजू सोमनाथ चव्हाण, बळीराम मधुकर अहिरे आदींनी सहभाग घेतला होता. महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन केल्यामुळे अनेकांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आयुक्त व महापौर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

Related Stories

No stories found.