महिला,मुलींनो छेडखानी होतेय.. डायल करा 0256288211

महिला-मुलींसाठी दामिनी पथक नियुक्त
दामिनी पथक धुळे
दामिनी पथक धुळे

धुळे Dhule । प्रतिनिधी

महिला व मुलींवर Women and girls होणार्‍या अत्याचारासह छेडखानीच्या harassed प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे District Police Force दामिनी पथकाची नियुक्ती Damini squad करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिविशाचे निरिक्षक प्रमोद पाटील Inspector Pramod Patil यांनी ही माहिती दिली आहे.

जिल्ह्यात मुलींची छेडछाड, महिलांसंबंधी अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व अशा घटनांमधील पीडितांना तात्काळ कायदेशीर मदत मिळण्यासाठी हे दामिनी पथक प्रयत्नशिल रहाणार आहे. हे पथकात दोन महिला पोलीस अधिकारी, सात महिला पोलीस कर्मचारी, पाच पुरूष कर्मचारी अशा प्रशिक्षीतांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आधुनिक वायरलेससह सुसज्ज वाहन, आवश्यक ते मनुष्यबळ, सायबर सेलची मदत व जीपीएस सुविधा पुरविण्यात आली आहे. धुळे शहर व परिसरातील पीडित महिला, मुलींना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी म्हणून 02562- 288211/288212 हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही पोनि.प्रमोद पाटील यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com