मोठी दुर्घटना झाल्यावर रस्त्याची दुरूस्ती करणार का?

धुळेकरांचा मनपाला सवाल, देवपूरातील मुख्य आग्रा रोडची दैना, पदाधिकारीही मुग गिळून
मोठी दुर्घटना झाल्यावर रस्त्याची दुरूस्ती करणार का?

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील मुख्य आग्रा रोडवरील (Main Agra Road) नवरंग पाण्याची टाकी ते दत्तमंदिर चौकापर्यंतच्या एका बाजुच्या रस्त्याची दीड वर्षापासून अंत्यत दुरावस्था (Extreme misery) झाली आहे. त्यामुळे अनेक वाहन धारक त्याच वेगाने राँग साईटने जातात. त्यामुळे मोठी दुर्घटना (Accident) होण्याची शक्यता आहे. प्रशासन (Administration) रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कोणाचा जिव जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल धुळेकरांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नाबाबत सत्ताधार्‍यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी देखील मुग गिळून असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेच्या(Municipal Corporation) माध्यमातून गेल्या वर्षी देवपूरात भुयारी गटारीचे (Underground sewer) काम करण्यात आले. त्यासाठी सर्वच रस्ते खोदण्यात आले. त्यात अनेक रस्त्यांची वाट लागली. आरोप, प्रत्यारोप, आंदोलनानंतर काही भागात रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

मात्र काही रस्ते अद्यापही जैसे थेच आहेत. त्यात विशेष करून भुमिगत गटारीसाठी मुख्य आग्रारोडवर एका बाजुला मधोमधे खोदकाम करून पाईप टाकण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने माती लोटून काम धकविले. संयमी धुळेकरांनी कुठलीही तक्रार केली नाही. त्यानंतर काही दिवसांनी वरवर खडी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र अवघ्या पंधरा दिवसातच खडीवर आली. आता तर नवरंग पाण्याची टाकी ते दत्तमंदिर चौकापर्यंतचा रस्ता म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणार ठरत आहे. रस्त्यावर विखुलेली खडी, कुठे खड्डे तर कुठे गतीरोधक, धुळ, माती त्यात अतिक्रमण, पार्कीग यामुळे एवढा रस्ता पार करणे म्हणजे वाहनधारकाला (vehicle owner) दिव्य ठरत आहे.

अनेक वाहनधारक तर एवढा रस्ता भरधाव वेगाने उलट दिशेन जातात. त्यामुळे क्राँसिगच्या ठिकाणी किरकोळ अपघात (Accident) त्यानंतर वादाचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. वास्तविक शहरातील हा प्रमुख रस्ता आहे. तरीही त्यांची दुस्स्ती होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्त्यावरून सर्वच अधिकारी, पदाधिकारी वापरतात. मात्र कोणीही त्यांची दखल घेतली नाही. त्यात आता पावसाळा सुरू होईल.

रस्त्याची आणखी वाट लागेल. त्यामुळे धुळेकरांचा संतात व्यक्त केला जात असून मनपा प्रशासन धुळेकरांचा अंत पाहत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या रस्त्यावर वापरणार्‍याची हाडे तर खिळखिळी होतातच परंतू वाहनाच्या टायरची लाईफ देखील कमी होत आहे. वाहन नादुस्त होत आहेत. त्यामुळे संयमी धुळेकरांची परीक्षा पाहु नका अन्यथा कधीही त्याचा विस्फोट होवू शकतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com