चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची दगडाने ठेचून हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची दगडाने ठेचून हत्या

धुळे । Dhule । प्रतिनिधी

चारित्र्याच्या (character) संशयावरुन (Doubts) शेतात पत्नीची (Wife) दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची घटना डांगशिरवाडे ता. साक्री येथे घडली. याबाबत पिंपळनेर पोलिसांनी (Pimpalner police) पतीला (Husband) अटक (Arrested) केली आहे.

साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे (Dangshirwade) येथे दिलीप हिराजी सोनवणे (Dilip Hiraji Sonawane) (वय 52) हा त्याची पत्नी मंडाबाई (Mandabai) (वय48) व मुलांसह राहतो. दिलीप हा नेहमी त्याच्या पत्नीच्या चारित्र्याचा(character) संशय (Doubt) घेत असे, गावातील लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत. असा आरोप करुन तो मंडाबाईशी वाद घालत होता. यातून पती-पत्नींमध्ये कलह निर्माण झाला होता.

दि. 16 फेब्रुवारी रोजी पती-पत्नी हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद (Argument) झाला. या वादात दिलीप सोनवणे याने तान्या डोंगर भिल यांच्या गट क्रं. 343/2 मधील शेताच्या बांधावर मंडाबाईचे डोके दगडाने ठेचून हत्या (Murder) केली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub-Divisional Police Officer) प्रदीप मैराळे (Pradip Mairale) हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन साळुंखे, उपनिरिक्षक प्रदीप सोनवणे, भाईदास मालचे यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला व मंडाबाईचा मृतदेह पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल केला. तेथे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

याबाबत पिंटू काळू गायकवाड यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात (Pimpalner Police Station) फिर्याद दिली. भादंवि 302 प्रमाणे दिलीप सोनवणे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलीपला अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com