पत्नीलाच 19 लाखात गंडविले

पत्नीलाच 19 लाखात गंडविले

धुळे । Dhule। प्रतिनिधी

पतीने (Husband) पत्नीला (wife) तब्बल 19 लाखात गंडा घातल्याचा (cheating) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह बँके शाखाधिकार्‍यांवर आझादनगर पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यासीराबानो मोहम्मद अकबर अन्सारी (वय 39 रा. गल्ली नं. 7 ताशा गल्ली, धुळे) याच्या फिर्यादीनुसार, त्यांचे कॅनरा बँकेच (Canara Bank) सामाईक बचत खाते आहेत. या खात्यावरून मोहम्मद अकबर मकबुल अन्सारी (रा. मिल्लत नगर, धुळे) व कॅनरा बँकेचा शाखाधिकारी (Branch Officer) या दोघांनी यासीराबानो हिच्या खोट्या स्वाक्षर्‍या (False signatures) आणि तिच्या आईचे खोटे अंगठे लावून परस्पर 19 लाख 57 हजार रूपये काढून फसवणूक (cheating) केली. हा प्रकार दि. 17 नोव्हेंबर 2011 ते 10 जुलै 2014 दरम्यान घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (crime) दाखल करण्यात झाला असून तपास पोहेकाँ डी.आर.पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.