आर्यन खानच्या क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी धुळ्याचे सुनिल पाटील कोण?

पुन्हा एक धुळे कनेक्शन ः या प्रकरणात हे नाव आले कसे? या महाशयांची पार्श्वभूमी तरी काय?
आर्यन खानच्या क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी धुळ्याचे सुनिल पाटील कोण?

अनिल चव्हाण

धुळे । Dhule।

गेल्या 15 दिवसांपासून बहुचर्चीत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याच्या कथीत क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात आता धुळ्यातील (Dhule) एका व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. याच व्यक्तीने या पार्टीबाबत ‘टीप्स’ ( Given ‘Tips) दिल्याचे सांगितले जाते आहे. सुनिल पाटील (Sunil Patil) असे या महाशयांचे नाव आहे.

आर्यन खानच्या क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी धुळ्याचे सुनिल पाटील कोण?
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

आधि ड्रग्ज पार्टी, त्यात अभिनेता शहारुख खानचा मुलगा आर्यनचा मुख्य समावेश आणि त्यानंतर बचावासाठी तब्बल 25 कोटीची मागणी.. अशा वेगवगळ्या अंगाने चर्चेत आलेला हा विषय नंतर थेट राजकीय पक्ष, मतभेद, तपास अधिकारी, त्यांचा धर्म आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनापर्यंत पोहचला. या सगळ्यांच्या पलिकडे जावून या प्रकरणात धुळ्याचे नाव येताच अनेकांचे कान टवकारलेत.

आता हे सुनिल पाटील कोण? याचे खोदकाम सुरु आहे. यामुळे सुनिल पाटील नाव असलेले अनेक जण शंका-कुशंकांच्या रडारवर आले आहेत.

परंतु या प्रकरणातील सुनिल पाटील हे धुळ्याचे असले तरी गेली अनेक वर्ष त्यांचा रहिवास मुंबईत आहे. कधी दिल्ली ते कधी गुजरात असेही त्यांचे वास्तव्य असते. उच्च पदस्थ अधिकारी आणि अनेक राजकारणी यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका दिवंगत मंत्र्यांचे निकटवर्ती म्हणूनही ते ओळखले जात.

अगदी डांन्स बार ते मंत्रालय असा त्यांचा सहज वावर असतो. मध्यस्थाची भूमिका निभावणे, न घडून येणार्‍या गोष्टी घडवून आणणे किंवा एखाद्या विषयाचे अथवा व्यक्तीचे पाळेमुळे शोधून आणणे, यात या महाशयांचा हात खंड असून यातून त्यांना तगडी बिदागीही मिळत असल्याचे बोलले जाते.

याच अनुशंगाने त्यांनी कॉर्डिलिया या क्रुझ वरील आर्यनच्या कथीत ड्रग्ज पार्टीची माहिती मिळविली आणि याची टिप्स एलसीबीच्या अधिकार्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी सॅम डिसुझा या व्यक्तीचा उपयोग केला. प्रकरण अंगाशी आल्याने सॅमनेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल पाटील या नावाचा भांडाफोड केला आहे.

धुळ्याशी संबंध काय?

  • धुळे शहरापासून अवघे दहा कि.मी. अंतरावर असलेल्या गावचे रहिवाशी सुनिल पाटील हा मुळात त्यांच्या पुर्वजांना मिळालेल्या ‘पाटीलकी’मुळे पाटील आडनाव लावतो. आजही धुळ्यातील टेकडी परिसिरात त्याचे आई-वडिल व अन्य सदस्य राहतात. याठिकाणी त्यांचा बंगलाही आहे.

  • सुनिल पाटील यांनी काही वर्षांपुर्वी शहरातील मध्यवर्ती भागातील गणेश मंडळाचे अध्यक्षपद स्विकारुन त्यावेळी लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. अधुन मधून धुळ्यात येणे-जाणे होत असले तरी त्यांचा नेमका ठावठिकाणा सांगता येणारा नाही.

  • सतत फिरस्तीवर असणारा हा गृहस्थ आर्यन प्रकरणात चर्चेत आला असला तरी त्याच्यामुळे पुन्हा एकदा धुळे चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणातही धुळ्याचे नाव घेतले गेले. यापुर्वी अशाच काही प्रकरणात धुळे चर्चेत आले. यात पुन्हा एकदा या सुनिल पाटीलमुळे भर पडली आहे.

Related Stories

No stories found.