चाकाची हवा तपासतांनाच काळाचा घाला, क्लीनर ठार

चाकाची हवा तपासतांनाच काळाचा घाला, क्लीनर ठार

धुळे । Dhule । प्रतिनिधी

ट्रकच्या चाकाची (truck's wheels) हवा (air) तपासतांनाच क्लिनरवर (Cleaner) काळाने झडप घातली. अज्ञात वाहनाने धडक (Hit by a vehicle) दिल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

बाबुभाई पोपटभाई मकवाना (वय 45 रा. भावनगर, गुजरात) असे मयताचे नाव आहे. तो जीजे 27 टीटी 3993 क्रमांकाच्या ट्रकने जात होता. काल दुपारी चालकाने ट्रक देवभाने (ता. धुळे) शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. त्या दरम्यान क्लिनर बाबुभाई हा ट्रकच्या उजव्या बाजुच्या चाकाची हवा चेक करीत असतांना त्याला धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रक चालक हिराभाई खोळाभाई राठोड यांनी सोनगीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ अहिरे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com