मोरदड तांडा येथे पाणी पुरवठा योजना मंजूर

पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

धुळे Dhule । प्रतिनिधी

धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या विशेष प्रयत्नातून मोरदड तांडा येथे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना (Independent water supply scheme) मंजुर (approved) करण्यात आली असून त्यासाठी एकूण 77 लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद (Provision of funds ) करण्यात आली आहे. आ.पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे या योजनेला नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सदर योजनेमुळे मोरदड तांडा येथील पाणी टंचाई (Water scarcity) कायमची संपणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

मोरदड तांडा (Mordad Tanda) ता.धुळे येथील रहिवाशी गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला (Water scarcity) सामोरे जात आहेत. दुष्काळी परीस्थिती आणि नैर्सिकरित्या पाण्याच्या स्त्रोतांचा अभाव यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी नेहमीच वणवण फिरावे लागत होते. पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून आ.कुणाल पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्नही केले. मात्र कायमस्वरुपी पाणी टंचाई दूर करण्यात यावी यासाठी स्वतंत्र पाणी पुरावठा योजना (Independent water supply scheme) मंजुर करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.

त्याअनुषंगाने संबधित विभागाला सूचना करुन नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करुन सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.सदर प्रस्तावास नुकतीच प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार नवीन विहीर, पाण्याची टाकी आणि पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 77 लक्ष रुपयाचा निधी मंजुर केला आहे. सदर योजना झाल्यानंतर येथील रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com