पांझरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अक्कलपाडा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले
पांझरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धुळे - प्रतिनिधी Dhule

धुळे पाटबंधारे विभागातर्गत असलेला मालनगाव मध्यम प्रकल्प व जामखेडी मध्यम प्रकल्प, (ता.साक्री) हे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणातून अनुक्रमे 1610 व 419 क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे.

त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे आज सकाळी 9 वाजता 2 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले असून 2080 क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com