
धुळे ।dhule। प्रतिनिधी
सातबारा उतार्यावर चुकुन झालेल्या विहिरीची नोंद (Well records less) कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजुर (Change entry approved) करण्यासाठी 15 हजारांची मागणी (demand a bribe) करून तडजोडीअंती दहा हजार रूपये लाच घेणार्या वाघाडीतील (ता. शिरपूर) मंडळाधिकार्यांला (board members) रंगेहात (Caught red-handed) पकडले. धुळे एसीबीच्या पथकाची लाचखोरा विरोधात आज सलग ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे लाचखोरांचे ढाबे दणाणले आहे.
शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील रहिवाशी असलेल्या तक्रारदाराची गावात वडिलोपार्जित शेत जमिन आहे. या शेत जमिनीमध्ये विहिर नसतांना सातबारा उतार्यावर चुकीने विहिर असल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे तक्रारदारास शेत जमिनीत विहिरीसाठी शासकीय अनुदान मंजुर होण्यासाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी सातबारा उतार्यावरील चुकीने झालेली विहिरीची नोंद कमी करण्यासाठी वकवाड येथील तलाठींकडे अर्ज केला. तलाठी वकवाड यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी विहिरीची नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेतलेली आहे.
ही नोंद मंडळाधिकारी यांनी मंजुर केल्याशिवाय विहिरीची नोंद कमी होत नसल्याने तक्रारदार यांनी वेळोवेळी मंडळाधिकारी अशोक गुजर यांना भेटून त्यांना विहिरीची नोंद कमी करण्याबाबत फेरफार नोंद मंजुर करण्याची विनंती केली. तेव्हा मंडळाधिकारी श्री. गुजर यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेत जमिनी संदर्भात यापूर्वी केलेल्या हक्कसोडच्या कामाचे बक्षीस म्हणून तसेच सातबारा उतार्यावर चुकुन झालेल्या विहिरीची नोंद कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने काल धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती. त्यामुळे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपुर येथे जावून तक्रारदाराची भेट घेऊन तक्रार नोंदवून घेतले. तसेच तक्रारीची पडताळणी केली असता मंडळाधिकारी श्री.गुजर यांनी तक्रारदाराकडे तडजोडी अंती 10 हजारांची मागणी केली.
लाचेची रक्कम त्यांच्या शिरपुर येथील मिलींद नगरमधील राहते घरी घेवून येण्यास सांगितले होते. त्यानुसार आज दि. 9 रोजी मंडळाधिकारी अशोक गुजर यांच्या शिरपुर येथील राहते घरी सापळा लावला. अशोक गुजर यांना तक्रारदाराकडून 10 हजार रुपये लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.