धुळे पोटनिवडणुकीत मतदारांचा उत्साह कमी

आज मतमोजणी
धुळे पोटनिवडणुकीत मतदारांचा उत्साह कमी

धुळे Dhule। प्रतिनिधी

महापालिकेच्या (Municipal Corporation) प्रभाग क्रमांक 5 ब साठी शांततेत मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही अनुचित घटना घडलेली नाही. सकाळी धिम्यागतीने मतदान झाले. तर दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला.

महापालिकेच्या प्रभाग 5 ब पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सकाळी 7.30 ते 11.30 दरम्यान 7.77 टक्के मतदान झाले. 940 पुरुष तर 719 महिलांनी मतदानाचा हक्क बजविला. पहिल्या सहा तासात दुपारी 1.30 वाजेपर्यत दोन हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने केवळ 13.09 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला.

दुपारी 3.30 वाजेपर्यंत 21.17 टक्के मतदान झाले. दोन हजार 581 पुरुषांनी तर एक हजार 937 महिलांनी मतदानाचा हक्क बजविला.

हेमाताई गोटे यांनी नगरसेविकेचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी प्रभाग 5 ब मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपातर्फे आरती पवार, महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या अनिता देवरे, मनसेतर्फे संध्या पाटील तर अपक्ष उमेदवार म्हणून विद्या नांद्रे यांचे भवितव्य आज यंत्रात बंद झाले.

सकाळी 7.30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूण 28 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी चार झोनल अधिकारी (एक राखीव), 32 केंद्राध्यक्ष, पोलिंग ऑफिसर्स 1, 2,3 (प्रत्येकी 32), 32 शिपाई अशा एकूण 160 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आज अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पीआय योगेश राजगुरु, एपीआय सय्यद यांनी मतदान केंद्रांवर पाहणी केली.

मतदारांनी फिरवली पाठ

या पोटनिवडणुकीसाठी प्रभागात एकूण 21 हजार 346 मतदार आहेत. परंतु, या निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. पहिल्या चार तासात सकाळी 11.30 वाजेपर्यत केवळ 1659 मतदारांनी हक्क बजावल्याने 7.77 टक्के मतदान झाले. त्यात 940 पुरुष व 719 स्त्री मतदारांनी मतदान केले. मतदार घराबाहेर पडत नसल्याने काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट पहायला मिळाला. परंतु दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करावा लागला.

आज मतमोजणी

उद्या दि. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहात ही मतमोजणी होईल. एकूण सहा टेबलांवर ही मतमोजणी होणार असून अवघ्या अर्ध्या तासात निकाल हाती येईल. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकुमार चिंचकर काम पाहत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com