श्रीमती बागल महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट

श्रीमती बागल महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट

दोंडाईचा Dondaicha । वि.प्र.

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे ( Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha) श्रीमती पी. बी. बागल महाविद्यालयास (Mrs. P. B. To Bagal College) राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) नुकतीच भेट दिली.

यावेळी नॅक कमिटीचे महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ.हेमंतराव देशमुख, (Former Minister Dr. Hemantrao Deshmukh,) उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ.रविंद्र देशमुख, सचिव अमित पाटील, माजी नगराध्यक्षा सौ.जुई पाटील, प्रभारी प्राचार्य व्ही.एम.पाटील, डॉ.रणजीत आठवले यांनी स्वागत केले.

राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे अर्थात नॅक समितीचे पियर टीम मेंबर्सचे चेअर पर्सन (Chairperson of peer team members) प्रो.मोहमद इक्बाल अली, कुलगुरू ककाटिया विद्यापीठ वारंगल (तेलंगणा), समन्वयक प्रोफेसर परेश जोशी (प्रोफेसर- राजकोट विद्यापीठ, गुजरात) तसेच सदस्य म्हणून प्राचार्य हरीशसिंह (जावलन्हूम विद्यापीठ मिझोरम) यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (ncc) विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. महाविद्यालयाच्या शालेय प्रशासन भौतिक व अन्य सुविधा, विषयनिहाय माहिती नॅकच्या पदाधिकारी यांनी जाणून घेतले आणि कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. रणजीत आठवले, प्रा.विश्वास पाटील, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.