सरकारसाहेब रावल यांना विकास रत्न पुरस्कार

सरकारसाहेब रावल यांना विकास रत्न पुरस्कार

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील दादासाहेब रावल उद्योग समूहाचे (Dadasaheb Rawal Industries Group) चेअरमन (Chairman) सरकारसाहेब रावल (Sarkar Saheb Rawal) यांना विकास रत्न पुरस्कार (Vikas Ratna Award) राज्यपाल भगतसिंग कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स (Maharashtra Chambers of Commerce,), इंडस्ट्री अ‍ॅण्ड ग्रीकल्चरचे (Industry and Agriculture) सुवर्ण महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नाशिक विभागातील यशस्वी उद्योग समूहांना (successful industry groups) विकासरत्न हा पुरस्कार (Vikas Ratna Award) देण्यात आला. त्यात दादासाहेब रावल उद्योग समूहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल (Sarkar Saheb Rawal) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Consumer Protection Minister Chhagan Bhujbal), महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खा. हेमंत गोडसे, उन्मेश पाटील, आ. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त रमेश पवार, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ग्रीकल्चरचे अध्यक्ष ललीत गांधी, उमेश दशरथी, सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.

दादासाहेब रावल यांनी 50 वर्षांपूर्वी मका (Maize) या पिकावर प्रक्रिया करणारा उद्योग (industry) दोंडाईचा सारख्या लहानशा गावात उभारला. त्यावेळी सरकारसाहेब केवळ 25 वर्षाचे होते. तेव्हापासून सरकारसाहेब रावल यांनी या उद्योग समूहाच्या भरभराटीसाठी अथक परिश्रम घेतले. अनेक संकटांना यशस्वी मात देत छोट्या उद्योग समूहाचे (industry groups) मोठ्या वटवृक्षात त्यांनी रूपांतर केले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी देखील सरकारसाहेब यांची जिद्द आणि चिकाटी उद्योग समूहाला एक वेगळ्या उंचीवर नेण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना विकासरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com