उत्तरकार्याची तयारी सुरु असतांनाच घराला आग

उत्तरकार्याची तयारी सुरु असतांनाच घराला आग

दोंडाईचा शहरातील घटना, संसारोपयोगी वस्तू जळून खाक

दोंडाईचा । Dondaicha । श.प्र.

येथील राणीपुरा परिसरातील नवा भोईवाडा (New Bhoiwada) येथे राहणार्‍या रामोळे कुटूंबात नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने उत्तर कार्याची तयारी (Uttara karyaci) सुरू असतांना आज पहाटे घराला अचानक आग (Sudden fire) लागून आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक (Burn) झाले. यात दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान (Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये जीवीत हानी झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

नवा भोईवाडा गणपती मंदिर परिसरात राहणारे घरमालक ताराचंद शंकर रामोळे यांचे तीन -चार दिवसापूर्वी निधन (Died) झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेचा विधी (Funeral rites)आटोपून जवळचे नातेवाईक उत्तर कार्यासाठी थांबले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व नातेवाईक अंगणात घराबाहेर झोपले होते. त्या दरम्यान पहाटे अचानक घराला आग ((Sudden fire)) लागली.

आगीत नातेवाईक यांचे कपडे, पैसे, बॅग मधील साहित्य, घरातील साहित्य जळुन खाक झाले. ताराचंद शंकर रामोळे यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. ताराचंद यांच्या उत्तर कार्याची तयारी सुरू होते. त्यापुर्वी घराला आग लागल्याने रामोळे कुटूंब बेघर झाले आहे. महसुल विभागाचे तलाठी संजीव गोसावी, कारकून बापू निकुंम यांनी नुकसानीचा पंचनामा (Punchnama of loss) केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com