शेती उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा-आ.कुणाल पाटील

कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ
शेती उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा-आ.कुणाल पाटील

धुळे - प्रतिनिधी Dhule

तालुक्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे म्हणून शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करावा. आम्ही नेहमी शेती आणि शेतकर्‍यांना प्राधान्य देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन आ.कुणाल पाटील यांनी केले. आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते कृषी संजीवनी सप्ताहाचा आज हडसूणे (ता.धुळे) येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी टॅक्टरवरील बीबीएफ पेरणी यंत्र चालवून प्रात्याक्षिक करुन दाखविले.

धुळे तालुका कृषी विभागामार्फत तालुक्यात दि.21 जुन ते 1 जुलै दरम्यान शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार्‍या विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून तसेच प्रत्यक्ष शेतात व गावागावात जावून शेतकर्‍यांना प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

या सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते पाणेश्‍वर मंदिर हडसुणे(ता.धुळे) येथे करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, कृषी संजीवनी सप्ताह शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात निश्‍चितपणे वाढ होते.

शेतकर्‍यांचे उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शेतीत नवनवीन तत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेती आणि शेतकरी खर्‍या अर्थाने या देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणून शेतकरी समृध्द झाला पाहिजे यासाठी आमचे प्राधान्य असते. कार्यक्रमात शांताराम मालपुरे, कृषी संचालक आत्मा यांनी प्रास्ताविकात कृषी संजीवनी सप्ताहाची माहिती दिली व शेतकर्‍यांना विविध योजना समजावून सांगितल्या.

शेती क्षेत्रात शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी टॅक्टरवरील बीबीएफ पेरणी यंत्र या आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांनी शेतीत बीबीएफ पेरणी यंत्र चालवून शेतकर्‍यांना प्रात्याक्षिक करुन दाखविले. आणि कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ केला. कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, आत्माचे कृषी संचालक शांताराम मालपुरे, तालुका कृषी अधिकारी जी.के.चौधरी, प्रगतीशील शेतकरी चुडामण, माजी सरपंच अरुण पाटील, चुडामण मराठे, प्रगतीशील शेतकरी शांताराम पाटील, संजय पाटील, कैलास केले, चेतन जिरे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रभावती पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com