शिंदखेडा तालुक्यात अवकाळीचे थैमान

शिंदखेडा तालुक्यात अवकाळीचे थैमान

शिंदखेडा/दोंडाईचा । Shindkheda / Dondaicha प्रतिनिधी/श.प्र

शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे, नेवाडे, सोनेवाडी भागात प्रचंड गारपीट (Hail) झाली असून दोंडाईचा परीसरात प्रचंड वादळी वार्‍यासह पाऊस (Rain with strong winds) झाला आहे. वादळामुळे विखुर्ले, रहिमपुरे, कुरूकवाडे येथे घरांचे व शेतीचे प्रचंड नुकसान (Damage) झाले आहे. एकटया कुरूकवाडे गावात तब्बल 18 पेक्षा अधिकच्या घरांची पत्रे उडाली असून काही मातीची घरे कोसळली (mud houses collapsed) आहेत. तसेच विजेची खांब, झाडे कोसळली आहे. कुरूकवाडे येथे एक जण जखमी झाला आहे.

धुळे जिल्ह्यात आज सायंकाळी काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथे सायंकाळी पाच वाजता वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. वार्‍यामुळे त्यात कल्पना सुदाम गुरव, नयन बाबूलाल पवार, रमेश सखाराम व्हावी, निर्मलाबाई दिलीप गिरासे, संतोष मोहन भील आदींसह 18 जणांच्या घरांचे पत्रे उडाले. त्यामुळे घरासह संसारोपयोगी वस्तुचे नुकसान झाले. पावसामुळे घरातील कापूसही भिजला. त्यातही चार ते पाच घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वार्‍यामुळे झाडे, तीन ते चार विजेचे खांब कोसळले आहे. या पावसामुळे ग्रामस्थ भयभित झाले होते. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र एक जण जखमी झाला आहे.

तलाठी रत्ना राजपूत, सरपंच वर्षा पाटील, ग्रामसेवक ओकार बोरसे, पोलीस पाटील, प्रकाश पाटील, पं.स. सदस्य सोनवणे यांनी पाहणी करत नुकसानीचा पंचनामा केला.

वरपाडेत गारपीटमुळे पिकांचे नुकसान- शिंदखेडा तालुक्यात बर्‍याच ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील वरपाडे व तापी काठावरील परिसरात, विरदेल रोड परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, कापूस यासह तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही पडले. पपईची झाडे देखील उन्मळून पडली आहेत. कापूस व्यापार्‍याचीही मोठी धावपळ उडाली. वरपाडे येथील शेतकरी वसंत पाटील यांनी नुकसानीचा त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

शिरपूरात गारपिट, धुळ्यात शिडकाव

शिरपूरातही काही भागात वादळी वार्‍यासह गारपिट झाली. तर काही भागात पाऊस झाला. त्यामुळे नागरिकासह व्यापार्‍यांची एकच धावपळ उडाली होती. तर धुळे शहरासह परिसरात सायंकाळी अवकाळीचा शिडकाव झाला. शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासारखी स्थिती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com