अधिकार्‍यांवरील एकतर्फी कार्यमुक्ती बेकायदेशीर : ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश

जि.प. सीईओ वान्मती सी. यांची कार्यपध्दत वादग्रस्त
Dhule zp
Dhule zp

धुळे । Dhule । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) ग्रामीण पाणी पुरवठा (Rural water supply) आणि स्वच्छता विभागाचे (Sanitation Department) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer) प्रदीप पवार (Pradip Pawar) यांना एकतर्फी कार्यमुक्त (Unilateral dismissal) करण्याची कार्यवाही बेकादेशीर (Proceedings are illegal) आहे. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि पवार यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीला स्थगिती द्यावी, असा आदेश ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री हसन मुश्रीफ (Rural Water Supply Minister Hasan Mushrif) यांनी विभागीय आयुक्तांना (Divisional Commissioners) दिला आहे. ग्रामीण विकास मंत्र्यांच्या आदेशामुळे आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Zilla Parishad Chief Executive Officer) वान्मती सी. (Vanmati C.) यांच्यावर दुसर्‍यांदा खुलासा करण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी तीन दिवसांची मुदत देऊन कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर पवार यांनी तिसर्‍या दिवशी नोटीशीला उत्तर दिले. पण, त्या उत्तराची सत्यता पडताळण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी यांनी लगेचच श्री. पवार यांना एकतर्फी कार्यमुक्त करीत असल्याचे कळविले. तसेच यापुढील कामकाज कोठे करावे किंवा काय याबाबत कार्यमुक्तीच्या आदेशात काहीही नमूद केले नाही. नैसर्गिक न्याय तत्वाचा अवलंब न करता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कार्यवाही केल्याबाबतचे स्पष्टीकरण पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी एकतर्फी केलेली कार्यमुक्तीची कार्यवाही चुकीची आहे. जिल्हा परिषद प्रशासनात काम करीत असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बदली करण्याचे अधिकार शासनाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बदलीचा आणि एकतर्फी कार्यमुक्त करण्याचा अधिकारच नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी नोंद घेत विभागीय आयुक्तांना सुनावणी घेण्याच आदेश दिले आहेत. त्यामुळे श्रीमती वान्मती सी. यांच्यावर खुलासा करण्याची दुसर्‍यांदा वेळ आली आहे. यापुर्वी एका सहाय्यक गटविकास अधिकारी असलेल्या महिलेस श्रीमती वान्मती सी. यांनी असेच एकतर्फी कार्यमुक्त केले होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्यावरील एकतर्फी कार्यमुक्तीच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी सुचना मंत्री मुश्रीफ यांनी विभागीय आयुक्तांना केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com