गॅरेजमधील चोरीचा 24 तासांच्या आतच लागला छडा

मालेगावातील दुचाकी चोरट्याला अटक, 5 दुचाकी हस्तगत
गॅरेजमधील चोरीचा 24 तासांच्या आतच लागला छडा

धुळे - प्रतिनिधी dhule

येथील चाळीसगाव रोड पोलिसांनी (Chalisgaon Road Police) शहरातील गॅरेजमधील (garage) चोरीचा 24 तासांच्या आतच छडा लावत चोरी करणाऱ्या विधी संघर्ष बालकासह माल घेणाऱ्यालाही अटक केली आहे.

गॅरेजमधील चोरीचा 24 तासांच्या आतच लागला छडा
ट्रॅव्हल्समधून होणारी गुटख्याची वाहतूक रोखली

याबरोबरच मालेगावातील (malegaon) दुचाकी चोरट्यालाही जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या दुहेरी कामगिरीचे एसपीनी कौतूक केले.

शहरातील गरीब नवाज नगरातील प्लॉट नं. 38 मध्ये राहणारे अन्सारी मोहम्मद अम्मार अब्दुल समी (वय 30) यांच्या मालकीच्या गॅरेजमध्ये दि.19 सप्टेंबर रोजी चोरट्यांनी चोरी केली. एकूण 20 हजारांचे गॅरेजच्या कामासाठी लागणारे गाड्यांचे काळया रंगाचे कव्हर असलेले तांब्याच्या तारांचे 6 बंडल चोरून नेले.

याप्रकरणी काल चाळीसगाव रोड पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास करीत असतांना घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील इसमाच्या हालचाली व शरीरयष्टी वरुन तसेच गुप्त बातमीदारमार्फत मिळालेल्या माहीतीवरुन हा गुन्हा विधीसंघर्षीत बालकाने केला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने त्या बालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.

गॅरेजमधील चोरीचा 24 तासांच्या आतच लागला छडा
Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ...मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’...

तसेच त्याने तांब्याच्या वायर असलेले बंडल आझादनगर भागातील भंगार दुकानदार सईद कासम खाटीक यास विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार खाटीक यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हयातील 20 हजारांचे तारेचे बंडल काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ अविनाश वाघ हे करीत आहेत.

याबरोबरच चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने मालेगाव येथील दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत. धुळ्यातील अजमेरा नगरातील खाजगी क्लासेस चालक इमराज अजिम पिंजारी (वय 35) यांची घरासमोर उभी मोटार सायकल (क्रं.एम.एच 18 एव्ही 2186) अज्ञात चोरट्याने दि.16 लंपास केली. तिची किंमत 40 हजार रुपये होती.

गॅरेजमधील चोरीचा 24 तासांच्या आतच लागला छडा
Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ...मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’...

याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास करीत असतांना या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकलसह एक इसम ग्रीन कॉलनी परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने ग्रीन कॉलनी परिसरातून मोटार सायकलीसह संशयीताला ताब्यात घेतले. जुबैदुर्र रहेमान अतिकुर रहेमान पठाण ( वय 19 रा.60 फुटी रोड पावर हाऊस, मदनी नगर, मालेगाव) असे त्याने त्याचे नाव सांगितले. गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली.

त्याच्याकडे पुन्हा विचारपुस केली असता त्याने एम. एच 18 एव्ही 2186, क्र. एम.एच. 18 ए.व्ही. 2356, विना क्रमांकाची युनिकॉर्न, क्र.एम.एच. 20 एस-2203 व क्र. एम.एच. 19 सी.पी 7760 अशा 1 लाख 90 हजार रूपये किंमतीच्या पाच मोटार सायकली काढून दिल्या. चाळीसगावरोड पोलिसात दाखल दोन गुन्हे उघड झाले आहेत. पुढील तपास असई दिपक पाटील व पोहेकाँ संदीप पाटील हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पोउनि विनोद पवार, संदीप काळे, ज्ञानदेव काळे, पोहेकॉ संदीप पाटील, अविनाश वाघ, पोना भुरा पाटील, रविंद्र ठाकुर, पोकाँ स्वप्निल सोनवणे, इंद्रजित वेराट, चेतन झोलेकर, प्रशांत पाटील यांनी केली आहे.

गॅरेजमधील चोरीचा 24 तासांच्या आतच लागला छडा
Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ...मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com