वणी बुद्रूक अपघातात दुचाकीस्वार ठार

वणी बुद्रूक अपघातात दुचाकीस्वार ठार
Accident

धुळे । Dhule । प्रतिनिधी

अमळनेर (Amalner) रस्त्यावरील वणी बुद्रूक (Wani Budruk) गाव शिवारात भरधाव दुचाकीने समोरून येणार्‍या दुचाकीला दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात काल दुपारी चार वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी धडक देणार्‍या दुचाकीस्वारावर गुन्हा (crime) नोंद झाला आहे.

संजय शिवनाथ पाटील असे मयताचे नाव आहे. तो दुचाकीने (क्र. एमएच 18 बीयु 9345) जात असतांना त्याला वणी बु.गाव शिवारातील नवनाथ बाबा मंदिराच्या पुढे वळणार समोरून भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने (क्र. एमएच 18 बीसी 1042) जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून संजय पाटील यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ज्ञानेश्वर वासुदेव पाटील (रा. शिरडाणे प्र. डांगरी ता. धुळे) यांच्या फिर्यादीवरून धडक देणार्‍या दुचाकीवरील चालकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय अनिल महाजन करीत आहेत.

Related Stories

No stories found.