पोलिसांवर हल्ला करणार्‍या पंजाबच्या दोघा आरोपींना बेड्या

लामकानीतील दक्ष ग्रामस्थांची मदत; पोलिस अधिक्षकांनी केला गौरव
पोलिसांवर हल्ला करणार्‍या पंजाबच्या दोघा आरोपींना बेड्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

सुरत येथून पोलिस व्हॅनमधून (Police van) पंजाबच्या दोघा आरोपींना (Two accused from Punjab) नांदेड येथे घेवून जात असतांना दोघांनी हातकडीनेच पोलिसांवर हल्ला (Attack on police) करत त्यांना रक्तबंबाळ करत पलायन केले होते. तेव्हा पासून पोलिस त्यांच्या मागावर होते. त्यासाठी गावागावात जनजागृती केली जात होती. त्यामुळेच तालुक्यातील लामकानीतील काही दक्ष ग्रामस्थांनी (villagers) दोघा आरोपींना पकडत (Catching) पोलिसांच्या हवाली केले. सोनगीर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिस अधिक्षकांनी (Superintendent of Police) याबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. तसेच या दक्ष ग्रामस्थांचा सत्कारही केला.

नांदेड विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल लुटीच्या गुन्ह्यातील आरोपी नवप्रितसिंग तसेंसुमसिंग मंदीपसिंग जाट (रा.आंबेरंपुरा, पोस्ट-जस्तरवाल, ता. अजनेला,जि.अमृतसर पंजाब) व मोहित उर्फ मनी विजय शर्मा (रा. गल्ली नं. 3 बाटलारोड, प्रीती नगर ता.जि. अमृतसर, पंजाब) या दोघांना व्यारा, गुजरात येथून नांदेड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले. तेथून शासकीय वाहनाने नांदेडकडे घेवून जात असतांना धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारातील इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ दोघा आरोपींनी उपनिरीक्षकासह चौघां पोलीस कर्मचार्‍यांना हातकडीने मारहाण करत, डोके फोडून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ देवके यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांवर हल्ला करून गुन्ह्यातील फरार आरोपी हे धुळे जिल्ह्यातील मेहेरगाव व निमडाळ परिसरातच फिरत असल्याची गोपनीय माहिती सोनगीर पोलिसांना मिळाल्यानंतर एपीआय चंद्रकांत पाटील व त्यांच्या पथकाने संबंधित परिसरात आरोपींचा शोध घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोपींचे फोटो वायरल करून जनजागृती केली. या आधारावर आज दि. 28 डिसेंबर रोजी दोन्ही आरोपी हे लामकानी परिसरात फिरत असल्याची व्हीडीओ क्लीप भरत वाघ, सुदाम माळी, सोनु माळी, पोलिस पाटील नितीन महाले व गावातील काही सुजान नागरिकांनी तयार केली. याची माहिती काही सोनगीर पोलिसांना दिली. आरोपींची खात्री झाल्याने पोलिसांच्या विनंतीवरून ग्रामस्थांनी दोघांना पकडले. त्यानंतर एपीआय पाटील व त्यांच्या पथकाने गावात जावुन दोघांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक नामदेव सहारे, अजय सोनवणे, फारुक शेख, अमरीश सानप, राहुल पाटील यांच्या पथकाने केली.

दोघांवर राज्यात गंभीर गुन्हे- दोघा आरोपींनी महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब राज्यात अनेक गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील मनमाड शहर, राहता (अहमदनगर), बदनापूर (जालना), व्यारा (गुजरात), नांदेड, धुळे तालुका व धुळे शहर पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com