एकाच कारचे दोन क्रमांक; मद्यतस्करी उघड

पिंपळनेर पोलिसांची कारवाई; चालक पसार, कारसह 11 लाखांचा दारूसाठा जप्त
एकाच कारचे दोन क्रमांक; मद्यतस्करी उघड

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

साक्री तालुक्यातील कुडाशी ते वार्सादरम्यान पेट्रोलिंग (Patrolling) करतांना एकाच वाहनावर गुजरातसह महाराष्ट्र राज्याची नंबरप्लेट दिसताच पोलिसांनी वाहनाला पकडले. चालक तर पसार झाला. मात्र या वाहनातून होणारी मद्यतस्करी (Alcoholic) उघड झाली. वाहनासह 11 लाख 36 हजार 875 रूपयांचा देशी, विदेशी दारूचा (Native, foreign liquor) साठा जप्त करण्यात आला.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि.सचिन साळुंखे हे पथकासह काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कुडाशी ते वार्सा दरम्यान पेट्रोलिंग करीत होते. त्यादरम्यान त्यांना हॉटेल कार्तिकी समोर एक कार उभी दिसली. या कारच्या पुढील भागाला जी.जे.05/आर.एच.1068 तर मागील भागाला एम.एच.02/ईयू 3341 या क्रमांकाची नंबरप्लेट होती. ही बाब सपोनि.साळुंखे यांच्या लक्षात आली. वाहनावर संशय आल्याने पोलीस त्या वाहनाजवळ जात होते. तेव्हा पोलिसांची चाहूल लागल्याने वाहन चालक कार सोडून पसार झाला. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात इम्पीरीयल ब्ल्यू, ब्लेंडर स्प्राईड, रॉयल चॅलेंज या विदेशी दारूसह रॉयल स्पेशल व्हीस्की व कासबर्ग किंगफिशर बियरचे डबे आढळून आले. 10 लाखांचे वाहन व 1 लाख 36 हजार 875 रूपयांचा दारूसाठा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस शिपाई विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकासह मालकावर अवैध दारू वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि सचिन साळुंखे पुढील तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुंखे, पोना विशाल मोहने, मकरंद पाटील, विजय पाटील, भूषण वाघ, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com