घंटागाडी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकित

कामगारांनी मांडली महापौरांकडे कैफियत, वॉटरग्रेस कंपनीला समज देण्याची मागणी
घंटागाडी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकित

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

घंटागाडी कामगारांचे (Ghaṇṭāgāḍī kāmagārān̄cē) दोन महिन्यांचे वेतन थकीत (Salary exhausted) त्यामुळे घंटागाडीवरील चालक व वाहकांनी (Drivers and carriers) आज महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांच्याची भेट घेवून कैफियत (Apology) मांडली. यावेळी घंटागाडी चालक व वाहकांनी महापौर कर्पे यांना निवेदनही दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील घनकचरा संकलन व वाहतूक करण्याचे काम नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीमार्फत आम्ही गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाडी वॉटरग्रेस कंपनीवर चालक व वाहक या पदावर काम करीत आहेत. सर्व कर्मचारी शहरातील कचरा संकलन व वाहतुकीचे काम करीत आहेत. परंतु, वॉटरग्रेस कंपनीने दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. याबाबत कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी तुम्हाला दोन महिन्याचे वेतन मिळणार नाही असे सांगितले. त्यामुळे आमचे दोन महिन्याचा थकीत पगार देण्याबाबत वॉटरग्रेस कपंनीला आदेश करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

यावेळी घंटागाडी कर्मचारी अक्षय बैसाणे, राकेश सूर्यवंशी, हिरामण वाघ, विनोद काकडे, संदीप कासोदे, उमेश देवरे, गोकूळ शिंदे, विकी माळी, सुनिल शिरसाठ, प्रवीण बैसाणे, सनी काकडे, शंकर जाधव, अभिजीत जाधव, जिवन चव्हाण, पवन माने, नरेंद्र लोंढे, राहुल अहिरे, गोपाल बैसाणे, वाल्मिक शिरसाठ, आकाश कदम, महेश शिंदे, विनोद शिरसाठ, अनिल मोरे, मनोज कुमार, रवी शिरसाठ, आनंद लाठे उपस्थित होते. दरम्यान, महापौर प्रदीप कर्पे यांनी घंटागाडी कामगरांची कैफियत ऐकूण तुम्हाला वॉटरगे्रसने नेमले आहे. यात महापालिकेचा थेट संबंध नसला तरी त्यात जी काही मदत करणे शक्य आहे ती केली जाईल. शिवाय महापालिकेला गरज भासल्यास तुम्हा कामगारांना प्राधान्याने काम दिले जाईल, असे आश्वासन कर्पे यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com