कंटेनरची दुचाकीला धडक : दोन जण ठार

कंटेनरची दुचाकीला धडक : दोन जण ठार

धुळे Dhule। प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील Mumbai-Agra Highway कमखेडा गावाच्या फाट्याजवळ भरधाव कंटेनरने container दुचाकीला bike दिलेल्या जोरदार धडकेत दोेघे जागीच ठार Both killed on the spot झाले. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी नरडाणा पोलिसात Nardana police गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन वना बैसाणे (वय 35), रविंद्र पांडूरंग पाटील (वय 45) अशी दोघा मयतांची नावे आहेत. तर भटाबाई रविंद्र पाटील या जखमी झाल्या आहेत. रविंद्र पाटील व त्यांची पत्नी भटाबाई (रा. नगाव) हे दोघे काल दि. 23 रोजी त्यांच्या काकांच्या अंत्ययात्रेसाठी रुंदावली (ता. शिरपूर) येथे दुचाकीने (क्र.एमएच 18- ए.एच. 8592) गेले होते. तेथून सायंकाळी घरी नगाव येथे परत येत असतांना त्यांना रस्त्यात नगाव गावातील गजानन वना बैसाणे (वय 35) हा भेटला. त्यामुळे त्याला दुचाकी चालवण्यास देवून दोघे दाम्पत्य मागे बसले. कमखेडा फाट्याचे अलीकडे शिरपुरकडून धुळ्याकडे जाणार्‍या महामार्गावर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने (क्र. एम.पी.09-एच.एच.0228 ) जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघे खाली पडले. गजानन बैसाणे आणि रविंद्र पाटील या दोघांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. तर रविंद्रची पत्नी भटाबाई पाटील या रस्त्याच्या कडेला फेकल्या जावून जखमी झाल्या. अपघातानंतर कंटेनर सोडून चालक पसार झाला. याप्रकरणी अनोळखी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण वना बैसाणे (रा.नगाव) यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकावर गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

No stories found.