जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी

जमावाकडून वाहनांची तोडफोड, परस्पर विरोधी फिर्याद
जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी

धुळे । dhule प्रतिनिधी

जुन्या धुळ्यात दोन गटात (Two groups) किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी (fighting) झाली. संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेद
जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

याप्रकरणी प्रतीक उर्फ मल्ल्या बडगुजर याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, काल रात्री 11 वाजेच्या सुमारास मोबाईलवरुन आकाश गणेश परदेशी याने फोन करुन तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. नंतर रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घरावर दगडफेक करून जमाव चालून आला.

घराबाहेर आल्यानंतर प्रतीकला बेसबॉल, हॉकीस्टीकने मारहाण करण्यात आली. तसेच अंगणतील दोन चारचाकी वाहन, तीन मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. त्याच्या फिर्यादीवरुन आकाश परदेशी, निखील बडगुजर, दिगंबर माळी, सागर परदेशी, दर्शन चौधरी, दर्शन माळी, प्रथमेश काळे, नंदू परदेशी, शिवम परदेशी यांच्यासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
Makeup Part 4 # असा करा Self makeup
जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

परस्परविरोधी कुंदन रवींद्र शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तो वरखेडी रोडने पायी जात असताना रिंक्कू बडगुजर, मल्ल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे, भूषण माळी आणि हर्षल महाचार्य हे गर्दी करुन त्याच्या जवळ आले. त्यांनी आकाश परदेशी सोबत का राहतो म्हणत वाद घातला.

जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
वन विभागाच्या कारवाईमध्ये ३० हजाराचा डिंक जप्त
जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

यावेळी मल्ल्या बडगुजर याने त्याच्या जवळील चाकू सारख्या वस्तूने छाती व खांद्यावर वार केला. यात कुंदन जखमी झाला. तर रिक्कु आणि सागर याने लाकडी दांड्याने व इतरांनी हातबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या फिर्यादीवरुन रिक्कू बडगुजर, मल्ल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे, भूषण माळी व हर्षल महाचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी
गुर्जर समाजाने केला हा आदर्श ठराव
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com