रस्ता दुरूस्तीसाठी पिंपळनेरकरांचा दोन दिवसाचा अल्टिमेट्म

रस्ता दुरूस्तीसाठी पिंपळनेरकरांचा दोन दिवसाचा अल्टिमेट्म

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरूस्त करावे यासाठी पिंपळनेर नागरिकांनी एमएसआरडीसी कंपनी, अप्पर तहसीलदार, सपोनि पिंपळनेर व सरपंच ग्रामपंचायत प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेट्म देण्यात आला असून रस्ता दुरूस्त केला नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपळनेर-सटाणा रस्त्याचे काम महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीतर्फे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे हा रस्ता जीवघेणा झाला आहे.

यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात पिंपळनेर शहरातून जाणार्‍या आनंद पेट्रोल पंप ते सबस्टेशन दरम्यान दोन कि. मी. अंतरावर रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही त्यामुळे अनेक अपघात होतात, यात एकाचा बळीही गेलेला आहे मात्र याकडे एमएसआरडीए ने पूर्ण दुर्लक्ष आहे.

नागरिकांना वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याआधी शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते मात्र कंपनी व ठेकेदाराने कोणतेही कारवाई केली नाही.

आज दि. 19 जुलै रोजी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता मात्र अप्पर तहसीलदार विनायक थवील, सपोनि सचिन साळुंखे, सरपंच देविदास सोनवणे यांच्या उपस्थितीत पिंपळनेर ग्रामपंचायत मध्ये बैठक घेण्यात आली.

नागरिकांच्या समस्या ऐकून तहसीलदार थविल यांनी कंपनीचे वासुदेव गोवा या ठेकेदाराची दूरध्वनीवरून संपर्क साधून जनतेच्या भावना कळविल्या व दोन दिवसात वरिष्ठ अधिकार्‍यांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे.

या बैठकीला माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर एखंडे, माजी सभापती संजय ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य पी. एस. पाटील, सुदाम पगारे, रविंद्र सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, भाजप शहराध्यक्ष नितीन कोतकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष बबलू पुराणिक, शिव वाहतूक सेनेचे नानू पगारे, तालुका प्रमुख सुनिल पवार, मनोज खैरनार, शिवा जिरे,अविनाश पाटील, खुशाल वाडेकर, किशोर चौधरी,संजय भिलाणे, बंडू पाटील दीपक साळुंखे, राकेश बदामे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com