
बोराडी Boradi । वार्ताहर
बोराडीसह परिसरात काल दि.6 रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार (lightning with heavy rain) पाऊस झाला. नांदेड गावात लिंबाच्या झाडावर (tree) वीज (lightning) पडून झाडाखाली उभ्या दोन म्हशी (Two buffaloes) व एक बैल (one bull) जागीच ठार (killed on the spot) झाले.
तर पावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काल बोराडी 68 तर सांगवीत 80 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड गावात निंंबाच्या झाडाखाली लक्ष्मण मंजा पावरा यांच्या मालकीचे दोन म्हशी व एक बैल बांधलेले होते. पंरतू रात्री झाडावर वीज पडल्याने दोन म्हशी व एक बैल जागीच ठार झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.