शिरपूर तालुक्यात दोन बोगस डॉक्टरांना अटक, एक फरार

शिरपूर तालुक्यात दोन बोगस डॉक्टरांना अटक, एक फरार

भरारी पथकांची कारवाई

बोराडी Boradi। वार्ताहर

जिल्हास्तरीय भरारी पथक व तालुका आरोग्य पथकाने (Taluka Health Squad) काल संयुक्तरित्या शिरपूर तालुक्यात मोहिम राबवित तीन बोगस डॉक्टरांना (bogus doctors) शोधून काढले. त्यात बोराडी येथील विजय बडगुजर, भगवान बडगुजर व उमर्दा येथील मंगल हिरा या तीनही बोगस डॉक्टरांवर सांगवी पोलिसात (Sangvi police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन बोगस डॉक्टरांना अटक (Arrested) करण्यात आली. तर एक कारवाईदरम्यान फरार झाला.

शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर व बंगाली डॉक्टरांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मात्र तरीही कारवाई होत नसल्यामुळे ग्रामस्थांसह आदिवासी सरपंच संघटनांनी एल्गार पुकारून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले. यात काल तीन वाजेच्या सुमारास बोराडी येथील पानसेमल रस्त्यावरील भगवान कांतीलाल बडगुजर यांच्या क्लिनिकवर भरारी पथकाने धाड टाकली. माऋ बोगस डॉक्टर हातून निसटला. तेथून काही औषधी व साहित्य पथकाने हस्तगत केले. तसेच सांगवी रस्त्यावरील विजय धुडकु बडगुजर यांच्या क्लिनिकवर छापा टाकत त्याला पकडण्यात आले. तेथून मोठ्या प्रमाणावर औषधीचा साठा हस्तगत करण्यात आला.

तसेच उमर्दा येथील मंगल हिरा या बंगाली बोगस डॉक्टरला भरारी पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडेही वैद्यकीय व्यवसायातील साहित्य मिळून आले. या तिन्ही बोगस डॉक्टरांविरुद्ध बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत पावरा व शिरपूर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांच्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील व उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सजगारपाडा, कोडीद, बोराडी, उमर्दा आदी गावामध्ये बोगस डॉक्टर आपले क्लिनिक चालवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वरील गावातील बोगस डॉक्टरांच्या क्लिनिकवर धाड टाकण्यात आली. बोराडी येथे दोन, उमर्दा येथे एक, सजगारपाडा येथील बोगस डॉक्टर क्लिनिक बंद करून पसार झाला होता. तर कोडीद येथील बोगस डॉक्टर असताना देखील त्याच्यावर पथकाला कारवाई करता आली नाही.

या पथकाने केली कारवाई

बा ही कारवाई बोगस डॉक्टर शोध पथकातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे, जिल्हा आयुक्त अधिकारी डॉ. संजय मोरे, शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागुल, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पावरा, खर्दे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील, आरोग्य सहाय्यक एस.आर.वानखेडे, अविनाश बडगुजर, बोराडी येथील औषध निर्माण अधिकारी श्याम पावरा आदींच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com