
धुळे । प्रतिनिधी dhule
शिरपूर शहरातील वरवाडे परिसरात घरगुती सिलिंडरमधील गॅस (gas) अवैध वाहनात भरतांना दोघांना पोलिसांनी (police) रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 11 सिलेंडरसह इलेक्ट्रीक मोटारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली.
शिरपुरातील (shirpur) रामसिंग नगरकडे जाणार्या रस्त्याजवळील हॉटेल भाऊ समोरील परिसरात वाहनांमध्ये गॅस सिलेंडरमधुन अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मिळाली होती. त्यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी प्राजक्ता सोमलकर, पोउनि संदीप मुरकूटे व शोध पथकासह दुपारी दीड वाजता सुमारास तेथे छापा टाकला. हॉटेल भाऊ समोरील रस्त्याचे पलीकडे श्रीकृष्ण सर्व्हीस सेंटर नावाने गाळा असलेल्या खोलीमागील जागेत व साई डिजीटल समर्थ ऑईल नावाचे पत्रटी दुकानात गणेश मोहन माळी (वय 24) व दिनेश राजेंद्र माळी (वय 31 रा. वरवाडे शिरपुर) हे गैरकायदेशीर रित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रीक मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरतांना मिळून आले.
एकुण 42 हजार रुपये किंमतीचे भारत कंपनीचे घरगुती वापराचे 11 गॅस सिलेंडर, 2 इलेक्ट्रीक मोटार, 2 वजनकाटे जप्त करण्यात आले. दोघांना ताब्यात घेण्यात आलने असून त्यांच्याविरुध्द पोकॉ गोविंद कोळी यांच्या तक्रारीवरुन जीवनावश्यक वस्तु कायदा सन 1955 मधील कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आगरकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोउनि संदीप मुरकूटे, शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, पोना मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद अखडमल व प्रशांत पवार यांनी केली.