जळगावसह धुळ्यातून दोघांना अटक ; लुटीच्या गुन्ह्याची काही तासातच उकल

जळगावसह धुळ्यातून दोघांना अटक ; लुटीच्या गुन्ह्याची काही तासातच उकल

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरातील सुरत (surat) बायपासवर तरुणाला लुटीचा गुन्हा एलसीबीच्या (lcb) पथकाने काही तासातच उघडकीस आणला. दोघाना जेरबंद केले असून एक फरार आहे. त्यांच्याकडून 11 हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. नकाणे (ता.धुळे) येथील पृथ्वीराज मन्साराम पाटील यांचा मुलगा देवेंद्र पाटील हा आज पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास नातेवाईकांना घेवून जाण्यासाठी शहरातील कृष्णा हॉटल जवळील बायपास रोडने पायी जात होता. तेव्हा दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी देवेंद्र याच्या हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याच्या हातातील मोबाईल व पॅन्टच्या खिशातील 1600 रुपये रोख जबरीन हिसकावुन पळुन गेले.

याबाबत पृथ्वीराज पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने. पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी स्थानीक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

त्यानुसार गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपाल गोपी रावलकर (वय 21, रा. जानकी नगर, कंजरवाडा, सिंधी कॉलनी रोड, जळगाव) यास जळगाव येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा त्याचा मेहुणा शंकर रतन साळुंखे (वय 22 रा. क्रांती चौक, चित्तोड रोड, धुळे) व साहील सुनील केदार (रा.नारायण मास्तर चाळ, चित्तोड रोड, धुळे) यांच्यासह मिळुन केल्याची कबुली दिली.

तसेच त्याने देवेंद्र पाटील याच्याकडुन हिसकावुन घेतलला मोबाईल काढून दिला. तर शंकर साळुंखे याला क्रांती चौकातील राहत्या घरातुन ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 6 हजारांचा एक व 5 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. साहिल केदार हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दोघांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान शंकर साळुंखे यांच्यावर शहर पोलिसात दोन गुन्हे तर साहिल केदार याच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल पोलिस ठाण्यात 5 व धुळे शहर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोऊनि योगश राऊत, असई संजय पाटील, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाण, रफीक पठाण, पोना योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलश सुर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के, सुनील पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन, गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com