तेलाचे बॅरल चोरणार्‍या टोळीतील दोघांना बेड्या ; धुळे एलसीबीची कामगिरी

पिकअपसह तीन लाखांचा मुद्येमाल जप्त
तेलाचे बॅरल चोरणार्‍या टोळीतील दोघांना बेड्या ; धुळे एलसीबीची कामगिरी

धुळे - प्रतिनिधी dhule

औरंगाबाद (aurangabad) येथून (oil) तेलाचे बॅरल (Barrel) चोरणार्‍या टोळीतील धुळ्यातील दोघांना येथील एलसीबीच्या (lcb) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दोघांकडून पिकअपसह तेलाचे बॅरेल असा एकुण तीन लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला

शहरातून दोन जण पिकअप वाहनातून (क्र.एमएच 18 एए 5836) चोरी केलेले तेलाचे बॅरल घेवुन ते विक्री करण्यासाठी घेवुन जाणार असल्याची गुप्त माहिती (lcb police) एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास वडजाई रोड येथून तेलाने भरलेले लोखंडी बॅरल घेवुन जाणार्‍या दोन जणांना पकडले.

दोघांनी त्यांची नावे शकील रफीक शेख (वय 30 रा.वल्लीपुरा, मौलवीगंज, धुळे) व असलम इरमाईल खाटीक (वय 35, रा.अंबिका नगर, धुळे) अशी सांगितली. तेलाच्या बॅरलबाबत विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडविची उतरे दिली. नंतर पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी हे तेलाचे बॅरल त्यांच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सुमारे 20 दिवसापुर्वी पिशोर, औरंगाबाद येथील एका गावातुन चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत दि. 25 फेब्रुवारी रोजी पिशोर पोलीस स्टेशन, औरंगाबाद ग्रामीण येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान दोघांकडून 1 लाख 800 रुपये किंमतीचे चार तेलाचे लोखंडी बॅरल व दोन लाखांचे पिकअप वाहन असा एकुण 3 लाख 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांना पुढील तपासासाठी पिशोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) , अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, हवालदार रफीक पठाण, पोना गौतम सपकाळे, राहुल सानप यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com