शांततेस उपद्रवी ठरणारे 12 जण धुळ्यातून हद्दपार

शांततेस उपद्रवी ठरणारे 12 जण धुळ्यातून हद्दपार

धुळे : dhule

मुस्लीम बांधवांचा (Ramadan Eid) रमजान ईद सण उद्या दि.3 रोजी साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने काही समाजकंटकांनी त्यांच्या वर्तनाप्रमाणे शहरात सण-उत्सव काळात काही उपद्रव केल्यास त्यातुन दंगली सारख्या घटना होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणुन शहरातील सार्वजनिक शांततेस उपद्रवी ठरणार्‍या 12 जणांना (Dhule city) धुळे शहरातून पाच दिवस हद्दपार करण्यात आले आहे.

त्यात योगेश हनुमंत भोकर, राजेंद्र कचरु मराठे उर्फ राजु महाराज, संजय रामेश्‍वर शर्मा, मुश्ताक शहा गुलाब शहा, शरीफ शहा गुलाब शहा, शरीफ शहा भोलु शहा, समीर अन्सारी मोहम्मद सुभान, साजिद हैदर शहा, परशुराम रघुवीर परदेशी, मोहम्मद सादीक मोहम्मद सलीम, धीरज रामेश्‍वर परदेशी व वसीम सलीम रंगरेज उर्फ वसीम वडया यांचा समावेश आहे. या गुन्हेगारी रेकॉर्ड असणार्‍या गुन्हेगारांचे धुळे शहर, आझादनगर व चाळीसगाव रोड (police) पोलीस ठाण्याकडुन हद्यपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांना पाठविण्यात आले होते. त्यावरुन उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी वरील उपद्रवी गुन्हेगारांना दि. 1 ते 5 मे दरम्यान धुळे शहरातुन हद्यपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

Related Stories

No stories found.