धनत्रयोदशीनिमित्त लाखोंची उलाढाल

धनत्रयोदशीनिमित्त लाखोंची उलाढाल

धुळे Dhule । प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीनिमित्त (Dhantrayodashi) बाजारपेठेत (market) लाखोंची उलाढाल (Millions turnover) झाली. सराफ बाजारही (Bullion market) गजबजला होता. कोरोना महामारीतही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी (Crowds for shopping) झाली होती. तर लक्ष्मीपूजना निमित्त पूजन वही, लक्ष्मी मूर्ती, पणत्या व पुजेचे साहित्य आदी खरेदीसाठी देखील बाजारपेठेत गर्दी झाली होती. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली.

हिंदू धर्मातील सर्वात मोठा मानल्या जाणार्‍या दीपोत्सवाला वसूबारसपासून सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. धनत्रयोदशीमुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिली. बाजारपेठेत सोन्या-चांदींच्या वस्तूंना या कालावधीत विशेष मागणी होती.

सोने 42 हजार 800 रुपये ग्रॅम दराने आज विक्री झाली. सराफ बाजारात विविध आकाराचे आकर्षक असे दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. सराफ बाजारात लाखोंची उलाढाल झाली.

दीपोत्सवात लक्ष्मीपूजनला विशेष महत्व आहे. यंदा लक्ष्मीपूजन 4 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीमूर्ती, विविध दिवे, आकाश कंदील, तोरण आदी विक्रेत्यांनी तात्परता दुकाने शहरात विविध ठिकाणी थाटली आहेत. तर दीपोत्सवामुळे मिठाईच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

झेंडूंची फुले 100 रुपये किलो

जिल्ह्यात झेंडूंच्या फुलांचे उत्पादन चांगले आले होते. परंतू बेमोसमी पावसाने हाती आलेले उत्पन्न हिसकावून घेतले. यामुळे दसर्‍याला 70 ते 80 रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली. परंतू दसर्‍यापेक्षा दिवाळीला फुलांची मागणी जास्त असल्यामुळे फुले विक्रेत्यांनी फुलांच्या दरात वाढ करुन 100 ते 120 रुपये दराने फुलांची विक्री झाली.

महापालिकेत धन्वंतरी पूजन

धनत्रयोदशीनिमित्त महापालिकेत पूजन करण्यात आले. तर जुन्या महापालिकेतील आयुर्वेदीक दवाखान्यात धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी आयुक्त देवीदास टेकाळे, उपमहापौर भगवान गवळी, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त पल्लवी शिरसाठ, महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, आरोग्य अधिकारी महेश मोरे आदी उपस्थित होते.

नवीन महापालिकेच्या इमारतीत वसुली विभागात तिजोरीचे आयुक्त टेकाळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर भगवान गवळी, स्थायी सभापती संजय जाधव, चंद्रकांत सोनार, युवराज पाटील, कमलेश देवरे, नगरसचिव मनोज वाघ, बलवंत रनाळकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com