‘अक्षय्य’ मुहूर्तावर कोट्यावधींची उलाढाल

सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
‘अक्षय्य’ मुहूर्तावर कोट्यावधींची उलाढाल

धुळे Dhule। प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तापैकी (three and a half moments) एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त (Akshayya Tritiye) नागरिकांनी सोने, चांदीसह नवीन वाहन, घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी (Purchase of goods) केली. तर अनेकांनी ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घेतला. एकुणच यातून कोट्यावधींची उलाढाल (Turnover of crores) झाली. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये (Professionals) समाधानाचे वातावरण दिसून आले. दरम्यान मोबाइल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर गिफ्ट आणि सूट असल्याच्या जाहिरातीमुळे ग्राहकांनी त्याचा विशेष लाभ घेतला.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह परिसरात नागरिक (Citizen) सहकुटुंब खरेदीसाठी (purchase) आले होते. तर व्यावसायीकांकडूनही एलईडी, मोबाइल हँडसेटवर सूट दिली जात होती. काही शोरूममध्ये शून्य टक्के व्याज दराने कर्जाची सोय उपलब्ध केली होती. सकाळी नऊपासूनच शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.

उन्हाचा तडाखा असल्यामुळे काही शोरूममध्ये दुपारी गर्दी कमी होती. मात्र सायंकाळनंतर बहुतांशी शोरूममध्ये ग्राहकांनी पुन्हा गर्दी दिसून आली. कोरोनानंतर मरगळ आलेल्या बाजारपेठेत आजच्या साडेतीन मुहूर्तांपैकी (three and a half moments) एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताने (Akshayya Tritiye) वेगळीच उंची गाठली. सायकल, कार, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्याचे दागिने यांना ग्राहकांनी पसंती दिली. काहींनी फ्लॅट बुकिंग केले. सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत व्यावसायिकांना दुकानांमध्ये गर्दी होती.

दागिने खरेदी (Buy jewelry) करण्यासाठी आलेल्या अनेकांना शोरूमबाहेर वेटिंग करावे लागत असल्याचे चित्र दिसून आले. याचबरोबर फर्निचर खरेदीवरही ग्राहकांनी जोर दिल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

अनेकांनी आज फ्लॅटची खरेदी (Buying a flat) केली. तर काहींनी जमिन घेतली. रेडी पझेशन फ्लॅटला ग्राहकांनी पसंती दर्शविली. काहींनी आजच्या मुहूर्तावर बुकिंग केलेे. त्यामुळे शहर परिसरातील रिअल इस्टेटमध्ये कोट्यावधींची उलढाल झाली. एकंदरीतच आजचा मुहूर्त ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांसाठीही सुवर्णयोग ठरला.

Related Stories

No stories found.