सांगवीचे आदिवासी पायपीट करीत पोहचले धुळ्यात!

वनजमिन कसणार्‍या आदिवासी शेतकर्‍यांना सातबारा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा
सांगवीचे आदिवासी पायपीट करीत पोहचले धुळ्यात!

धुळे । Dhule । प्रतिनिधी

वनजमिन (Forest land) कसणार्‍या आदिवासी शेतकर्‍यांना (tribal farmers) सातबारा मिळेपर्यत सातबाराचे सर्व अधिकार द्यावेत व प्रलंबित दावे (Pending claims) निकाली काढावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा (Maharashtra Rajya Kisan Sabha) व बिरसा फायटर्सच्या (Birsa Fighters) नेतृत्वातसांगवी ता.शिरपूर येथून काढण्यात आलेला आदिवासी शेतकर्‍यांचा मोर्चा (Morcha) आज धुळ्यात धडकला.

अतिशय शिस्तबध्दपणे काढण्यात आलेला मोर्चा (Morcha)शहरातील प्रमुख मार्गावरुन क्युमाईन क्लब येथे आल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला (district administration) मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

सांगवी (Sangvi) येथून काल सकाळी 11 वाजता निघालेला हा मोर्चा कापडणे येथे मुक्कामी होता. त्यानंतर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो धुळ्यात धडकला. आदिवासी बांधव दोन जणांच्या रांगेत शिस्तबध्दपणे हातात किसान सभेचा झेंडा(Kisan Sabha) घेवून मार्गस्थ होत होते. क्युमाईन क्लबजवळ हा मोर्चा आल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले.

मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे (Kisan Sabha) कार्याध्यक्ष कॉ.प्रा.राजू देसले, धुळे जिल्हा किसान सभेचे सल्लागार अ‍ॅड.मदन परदेशी, बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा यांनी केले. या मोर्चात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.हिरालाल परदेशी, कॉ.अर्जून कोळी, कॉ.साहेबराव पाटील, कॉ.वसंत पाटील, शिलदार पावरा, डॉ.किशोर सूर्यवंशी, रामदास पावरा, रामचंद्र पावरा, लाकड्या पावरा, मगन पावरा, अ‍ॅड.संतोष पाटील, भरत सोनार, जितेंद्र देवरे, प्रमोद पाटील, अ‍ॅड.सचिन थोरात, पोपटराव चौधरी, कांतीलाल परदेशी, हिरालाल सापे, अशोक बाविस्कर, वसंत पावरा, ईश्वर मोरे आदी पदाधिकारी व आदिवासी शेतकरी सहभागी झाले होते.

एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, वन अधिकारी अधिनियम 2006 व 2008 अस्तित्वात येवून 14 वर्षे झाली. तरीही अद्याप पर्यत आदिवासी (Tribals) बांधवांच्या नावे सातबारा झालेला नाही. सातबारा होण्यासाठी किंवा सातबाराचे अधिकार मिळण्यासाठी दि.26 जुलै 2017 रोजी सांगवी येथे हजारो शेतकर्‍यांनी रास्तारोको (Stop the way) आंदोलन केले होते. तसेच दि.27 जानेवारी 2021 रोजी सांगवी येथे आदिवासींच्या प्रश्नांवर रास्ताराको आंदोलन करण्यात आले.

अनेक आंदोलन करुनही आजपर्यंत आदिवासी (Tribals) बांधवांच्या वनजमिनीचा सातबारा होत नाही. परिणामी, अनेक शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. तसेच अनेक दावे पेंडींग आहेत. काही आदिवासी बांधवांचे जमिनी मोजणीही बाकी आहे. काही आदिवासी बांधव वनजमिन कसतात, पण त्यांचे दावेच दाखल नाहीत. उपविभागीय समिती आता दावे दाखल करुन घेत नाहीत. म्हणून आदिवासी बांधव अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याकडे जमिनी आहेत. आदिवासी शेतकर्‍यांना जमीनीचे सातबारा नसल्यामुळे योजनांचा लाभ मिळत नाही. म्हणून शासनाला जागे करण्यासाठी किसान सभेने (Kisan Sabha) हा एल्गार पुकारल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच आदिवासी बांधवांना सातबारा मिळेपावेतो सातबाराचे सर्व अधिकार देण्यात यावेत, पेंडींग दावे निकाली काढावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com