बारीपाड्यासह 15 गावांचा केला पायी प्रवास

देशभरातील 23 तरुणांचा अभ्यास दौरा : चांगल्या गोष्टी आमच्या भागात रुजविणार-कुमार शुभम
बारीपाड्यासह 15 गावांचा केला पायी प्रवास

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

सेवा इंटरनॅशनल फिलोसिपमार्फत (Service International Philosophy) देशभरातून सेवाकार्य करणार्‍या 23 तरूणांंचा गृप (Youth group) भोपाळ येथून नुकताच पिंपळनेर पश्चिम पट्टयात दाखल झाला होता. या गृपने बारीपाड्यासह 15 गावांचा पायी(Walking tour of villages)प्रवास केला. भविष्यातील शाश्वत विकास मूर्त स्वरूप देण्यासाठी हे तरुण काम करत आहेत. काल पिंपळनेर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

देशाच्या विविध राज्यातून 28 तरूणांचा गृप भोपाळ येथून शाश्वत विकास व त्याचा अभ्यास करण्यासाठी निघाले असून ते पिंपळनेर येथून वार्सा येथे नुकतेच दाखल झाले. येथून त्यांनी पदयात्रा सुरू केली. बारीपाडा, मोहगाव, सुरजा, माळ, धामणधर, मंडाने, पारगाव, बल्हाणे, साल्हेर किल्ला तसेच सोमपूर, जलसुरंग अशा ठिकाणी भेटी दिल्या. या ठिकाणीचे राहणीमान, जल, जंगल जमीन शेती व पशुधन विविध प्रकारचे अन्नधान्य यावरील शाश्वत विकास यावर अभ्यास दौरा केला. त्यांना आदिवासी भागातील सर्व स्तरावरील गोष्टीं चांगल्या वाटल्या. येथील चांगल्या गोष्टी आम्ही आमच्या भागात कशा रुजवता येतील यावर आमचा दृष्टिक्षेप, असल्याचे तरूणांचे प्रतिनिधी कुमार शुभम यांनी सांगितले.

दरम्यान समाज कार्य करणार्‍या या फिलोसिफर यांचा दमंडकेश्वर लॉन्स येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्गमित्र चैत्राम पवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सचिन साळुंखे पं.स. सदस्य देवेंद्र पाटील, डॉ. मनिष सूर्यवंशी, डॉ.अरुण ओझरकर, डॉ. मिलिंद कोतकर, पंकज दुसाने, कुमार शुभम, मोतीलाल पोतदार, सुभाष जगताप, राजेंद्र गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी पिंपळनेर करांतर्फे 28 विविध राज्यातील समाजकार्य करणारे फिलोसिफर यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी सपोनि सचिन साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चैत्राम पवार यांनी या समाजकार्य करणार्‍या 28 तरूणांनी आदिवासी भागातील विविध क्षेत्रात दौरा करून शाश्वत विकासासाठी संघटन समाज व सेवाभाव यांचा अभ्यास केला. आमच्याकडील ज्या चांगल्या गोष्टी असतील त्यांनी आपल्या भागाकडे जरूर अंमलात आणाव्यात. ज्या आमच्याकडे चांगल्या नसतील त्या सोडून द्याव्या, असे सांगून या तरुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम शर्मा यांनी केले. तर आभार पंकज दुसाने यांनी मानले.

अभ्यास दौर्‍यात यांचा सहभाग

या अभ्यास दौर्‍यात देशातील विविध राज्यातील कुमार शुभम, शुभम शर्मा, हेमंत बंके, मधुसूदन, सुनील (दिल्ली), ओम प्रकाश, दीपा मेहरा, खेमलाल (छत्तीसगड), लखबीन सिंग (राजस्थान), रजत सिंग ( उत्तर प्रदेश), अर्जुन प्रकाश, विवेक थामन, वर्शाजी, (केरळ), सुरज दींग्रे, कल्याणी (महाराष्ट्र), अरविंद पाटीदार (मध्यप्रदेश), सुशील, नेहा (हैदराबाद),अशुद वालिया (हिमाचल प्रदेश), नेहा तिवारी, परविन्द्र, (उत्तर प्रदेश), अनन्या बासू (पश्चिम बंगाल), निया तापो (अरुणाचल प्रदेश), पायल सिंग, मोनी कुमार (बिहार), किर्ती तोमर (मध्य प्रदेश), बबली देवी (आसाम) यांचा सहभाग आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com