तृतीय पंथीयांबाबत धुळ्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची आढावा बैठकीत सूचना, तृतीयपंथीय व्यक्तींच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष
तृतीय पंथीयांबाबत धुळ्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

धुळे । प्रतिनिधी

तृतीयपंथीय (transgender) व्यक्तींच्या रहिवासासाठी (residence) जमीन मागणीचा (Land demand) प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या (Department of Social Welfare) माध्यमातून सादर करावा. त्यावर महसूल विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी दिल्या.

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या (transgender) समस्या, तक्रारी (Complaints) संदर्भात जिल्हास्तरावर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम.एम. बागूल, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, अशासकीय सदस्य पार्वती जोगी, सचिन शेवतकर, अ‍ॅड. विनोद बोरसे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, केंद्र सरकारने (Central Government) तृतीयपंथीय व्यक्तींसाठी (National Portal For Transgender Person) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी नाव नोंदणी करावी. या नोंदणीच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे अभिप्रेत आहे. त्यासाठी समाजकल्याण विभाग व तृतीयपंथीयांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

तृतीयपंथीय व्यक्तींच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय (District Hospital) आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. तेथे तृतीयपंथीय (Transgender) व्यक्ती दाखल झाल्यावर त्यांच्यावर आवश्यक सर्व ते उपचार करण्यात यावेत. नागरी व ग्रामीण भागात स्वतंत्र स्वच्छता गृहे बांधावीत असे त्यांनी सांगितले.

किमान कौशल्य विकास (Minimum skill development) कार्यक्रमातून शेळीपालनासाठी तृतीयपंथीयांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे संबंधितांना तातडीने प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे. याशिवाय बाह्यस्त्रोतांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांनी तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगारासाठी प्राधान्य (Preference for employment) द्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केल्या.

तृतीयपंथियांच्या हक्कांचे संरक्षण (Protection of rights) व कल्याण योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून तृतीयपंथियांचे स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने सर्वेक्षण, नोंदणी करणे, विहित नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करून देणे, शिधापत्रिकेसाठी मदत करणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मोहीम राबविणे, आरोग्य शिबिर, स्वयंरोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत पार्वती जोगी, श्री. शेवतकर, अ‍ॅड. बोरसे आदींनी सहभाग घेवून विविध सूचना केल्या. प्रास्ताविक समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com