ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात ; शालकासह मेहुणा ठार

ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात ; शालकासह मेहुणा ठार

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरातील (parola) पारोळा रोडवरील पुलावर अचानक थांबलेल्या (Tractor) ट्रॅक्टरवर दुचाकी (accident) आदळून झालेल्या अपघातात शालकासह मेहुणा ठार झाला. काल सकाळी हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात ; शालकासह मेहुणा ठार
Accident टायर फुटल्याने महामार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

रविंद्र लालदास शिंदे (वय 27 रा. वडजाई ता. धुळे) त्याचा शालक जयशंकर वाघ (वय 19 रा. डहाणू जि. पालघर) हे दोघे काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 18 एक्यु 6178) जात होते. त्यादरम्यान पारोळा रोडवरील पुलावर त्यांच्या पुढे चालणार्‍या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत आनंदा कृष्णा शिंदे यांनी आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक इंद्रजित उत्तम सैदाणे (वय 45 रा. आंबेडकर पुतळ्याच्या मागे फागणे ता. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय लक्ष्मी करंकर या करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com