
धुळे dhule प्रतिनिधी
धुळे ते चाळीसगाव रोडवरील तरवाडे बारीजवळ (Tarwade Bari) ट्रॅक्टर आणि दुचाकीत (Tractors and two-wheelers) झालेल्या अपघातात (accident) एक जण (One person) जागीच ठार (killed on the spot) झाला तर दोन जण (Two people were injured) जखमी झाले आहेत.
अपघातानंतर ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. त्यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. दिनेश तुकाराम देसले (वय 35, रा. विंचूर ता. धुळे ) असे मयताचे तर अविनाश भाऊसाहेब पगारे ( वय 28) असे जखमीचे नाव आहे.
दोघे दुचाकी आज सायंकाळी जात होते. तेव्हा तरवाडेनजिक भरधाव दुचाकी आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जबर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरमध्ये स्पार्किंग होऊन ट्रॅक्टरने मोठा पेट घेतला.
या अपघातात दुचाकी वरील दिनेश दिसले हे जागीच ठार झाले. तर अविनाश पगारे आणि ट्रॅक्टर चालक हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे विंचूर गावात शोककळा पसरली आहे. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.