छळ करत सुनेवर बलात्कार, सासर्‍यासह तिघांवर गुन्हा

छळ करत सुनेवर बलात्कार, सासर्‍यासह
तिघांवर गुन्हा

धुळे । Dhule प्रतिनिधी

छळ करत सासर्‍यानेच (father-in-law) सुनेवर वारंवार बलात्कार (Frequent rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासर्‍यासह तिघांवर देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

देवपूरातील वाडीभोकर रोड परिसरात राहणार्‍या पिडीत 26 वर्षीय विवाहितेने (Married) पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचे लग्नानंतर दुसर्‍या दिवसापासून पती अश्विन विकास तायडे, सासु शालिनी विकास तायडे व सासरे विकास वायलाजी तायडे (रा.मनपा शाळा क्र. 19 जवळ, सृष्टी विजय कॉलनी, रूख्मनी नगर, अमरावती व अड्रीनो टॉवर, मगरपट्टा, पुणे) यांनी तिचा छळ सुरू (Persecution continues) केला. पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 40 लाख रूपये आणावे, अशी मागणी केली.

पैसे आणले नाही (No money brought) म्हणून तिच्या चारित्र्यावर खोटा संशय घेवून तिला घटस्फोट (Divorce) देण्याची व नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी दिली. शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तर सासरे father-in-law विकास तायडे यांनी तिचा छळ करून वेळोवेळी धुळे, अमरावती व पुणे येथे बळजबरीने वाट्टेल तेव्हा कुकर्म (rape) केलं.

लज्जास्पद वागणूक देवून तिचा विनयभंग केला. वेळोवेळी तिच्यावर बलात्कार करून तिचा तुच्छ वागणूक दिली. तिच्या अंगावरील स्त्रीधन स्वतःकडे ठेवून घेतले. म्हणून तिघांवर भादंवि कलम 376, 376 (2), (न) (फ), 354, 354 (अ), 398 अ, 406, 323, 504, 506,34 सह हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा (crime) नोंद झाला आहे. तपास पिआय मोतीराम निकम करीत आहेत.

Related Stories

No stories found.