केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आज तर राज्यमंत्री डॉ. कराड उद्या दोंडाईच्यात
USER

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आज तर राज्यमंत्री डॉ. कराड उद्या दोंडाईच्यात

दोंडाईचा dondaich । दि.25 । प्रतिनिधी

माजीमंत्री आ.जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal )यांच्या पाठपुराव्याने दोंडाईचा नगरपरीषदेच्या (Municipal Council of Dondaicha) माध्यमातून गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या विकास कामांच्या (development works Lokarpanasa) लोकार्पणासाठी (Lokarpanasa) उद्या दि. 26 रोजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Union Minister for Minorities Mukhtar Abbas Naqvi) तर दि. 27 रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (State Minister Dr. Karad )यांचा दोंडाईचा येथे दौरा आहे.

या दोन्ही मंत्रीच्या हस्ते कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांच्या जाहिर सभा देखील होणार आहेत.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी हे दि. 26 रोजी 11 वाजता शिरपूर विमानतळावर विमानाने येतील. त्यानंतर 11.50 वाजता दोंडाईचा नगरपालिकेत करण्यात आलेल्या कामांचे सादरीकरण याठीकाणी पाहतील. त्यानंतर 12.05 वाजता गरीब नवाज कॉलनी येथे अल्पसंख्याक निधीतून साकारलेल्या मुस्लीम समाज सभागृहाचे लोकार्पण करतील. त्यानंतर त्याचठिकाणी खुल्या जागेवर निर्माण करण्यात आलेल्या विकास कामांचा लोकार्पण होईल. त्यानंतर पटेल कॉलनीत 10 कोटींच्या निधीतून साकारण्यात आलेल्या रस्त्याच्या कामांचे लोकार्पण होईल. दुपारी 1 वाजता जामा मशिदीजवळ एकता चौकाचे भूमिपूजन करून त्याचठिकाणी ते जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर रावल गढीवर भेट देवून शिरपूर विमानतळाकडे रवाना होणार आहेत.

तर दि. 27 रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा दौरा असून ते सकाळी धुळयातील कार्यक्रम आटोपून दोंडाईचा येथील वंजारी समाज मंगल कार्यालयासह अनेक कार्यक्रमांचे लोकार्पण तसेच भूमीपूजन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com