हिंदू नववर्षाननिमित्त आज शोभायात्रा, वानरसेनेसह सजिव देखाव्यांचा समावेश

पक्ष, विचार बाजुला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन
हिंदू नववर्षाननिमित्त आज शोभायात्रा, वानरसेनेसह सजिव देखाव्यांचा समावेश

धुळे ।Dhule प्रतिनिधी

हिंदू नववर्ष यात्रा सर्वसमावेशक समितीतर्फे (Hindu New Year Yatra Comprehensive Committee) हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त (Gudipadva) शोभायात्रेचे (Organizing the procession) आयोजन करण्यात आले आहे. त्यात पारंपारिक वाद्यांसह राम परिवार, वानरसेनेचा सजिव देखावा राहील. दुपारी 4.30 वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून (statue of Mahatma Gandhi) शोभायात्रेला प्रारंभ होईल. पक्ष, विचार बाजुला ठेवून हिंदू म्हणून शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांच्यासह मान्यवरांनी पत्रकार परिषदेत केले.

श्री नारायण बुवा समाधी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समिती सभापती शितल नवले, भाऊमहाराज रूद्र, रविंद्र बेलपाठक, योगिराज मराठे, संदीप अग्रवाल, राजेंद्र खंडेलवार, संजय बोरसे, संजय शर्मा, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, ज्योत्स्ना मुंदडा आदी उपस्थित होते.

गेल्या 18 वर्षापासून समितीतर्फे शोभायात्रा काढली जात आहे. परंतू गेल्या तीन वर्षापासून कोरोनाच्या (Corona) संकटामुळे ही शोभायात्रा स्थगीत करण्यात आली होती. आता शासनाने निर्बंध देखील हटविले आहेत. त्यामुळे यंदा शोभायात्रा (Shobha Yatra) जल्लोषात काढण्यात येणार आहे. शोभायात्रेची सुरूवात श्री. नारायण बुवा समाधी मंदीर मोठ्या पुलाजवळून होईल.

पुढे जुने धुळे, चिंचेचे झाड, कुंभार खुंट, गल्ली नं. 6, चैनी रोड, गल्ली नं. 4 मार्गे सरळ राजकमल चित्रमंदिर, आग्रा रोडने श्रीराम मंदिर येथे महाआरतीने या शोभायात्रेचा (Shobha Yatra) समारोप होणार आहे. शोभायात्रेत आई एकविरा देवीची पालखी, लेझिम पथक, भजन, वारकरी तसेच राम परिवार, वानरसेना असे सजिव देखावे देखील राहणार असल्याचे समितीचे राजेंद्र खंडेलवाल यांनी यावेळी सांगितले.

तर महापौर प्रदीप कर्पे यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून मनपा आपले योगदान देणार असल्याचे सांगितले. हिंदूंनी संघटीत होणे ही आज काळाजी गरज झाली आहे. त्यामुळे पक्ष, विचार बाजुला ठेवून मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन रविंद्र बेलपाठक यांनी केले. नागरिकांनी (Citizens) पारंपारीक गणवेशात (traditional uniforms) सहभागी व्हावे, असेही आवाहन समितीतर्फे करण्यात आले.

Related Stories

No stories found.