दीक्षार्थ्यांसह आज कुसुंब्यात 25 मंगल कलशाची मिरवणूक

दीक्षार्थ्यांसह आज कुसुंब्यात 
25 मंगल कलशाची मिरवणूक

धुळे Dhule । प्रतिनिधी

कुसुंबा, ता. धुळे येथे जैनेश्वरी दीक्षार्थ्यांसह (Jaineswari Diksharthya) 25 मंगल कलशाची (Mangal Kalash) मिरवणूक (Procession) उद्या दि. 17 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

कुसुंबा जन्मभूमी असलेले खान्देशातील प्रथमाचार्य प.पू. वात्सल्य मुनीश्री 108 मयंकसागरजी महाराजांच्या तसेच जैनेश्वरी दीक्षा घेणारे औरंगाबादचे श्री कस्तुरचंद लोहाडे, सौ. कांताबाई लोहाडे यांचे दि. 17 जुलै रोजी कुसुंब्यात आगमन होईल. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत होईल तसेच त्यांचा सत्कार येथील पदमावती युवा मंच तसेच समाज बांधवांतर्फे करण्यात येणार आहे.

अतिशय क्षेत्रावर प.पू. तपस्वी सुहितसागरजी मुनीश्रींचा चातुर्मासानिमित्त 25 मंगल कलश स्थापना कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी दोन दीक्षार्थ्यांचे आणि 25 मंगल कलशधारीची सात रथावरून सकाळी आठ वाजता मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे.

मिरवणुकी नंतर दहा वाजता त्यागी विश्राम भवनात चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com