गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना शिरपूर शहर पोलिसांच्या बेडया

दुचाकीसह ८६ हजारांचा गांजा जप्त
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना
शिरपूर शहर पोलिसांच्या बेडया

धुळे Dhule प्रतिनिधी

शिरपुर शहर पोलिसांची (police) गांजा तस्करी (Cannabis smuggling) करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले (Caught) असून त्यांच्याकडून दुचाकीसह 86 हजारांचा गांजा जप्त (Cannabis confiscated) करण्यात आला आहे. आज सायंकाळी शिरपुर फाटा ही कारवाई करण्यात आली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख (Police Inspector Ravindra Deshmukh) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरपुर फाटा येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे खाली एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांना पकडले.

दोघांनी त्यांची नावे मिथुन जवल्या पावरा (वय २९ रा.उमरदा ता.शिरपूर) व लेस्टर अँथोनी डिसुजा (वय ३७ रा.लोचर गाव, मड आयलँड, मलाड वेस्ट जि.मुंबई) असे सांगितले. त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता त्यात प्रवासी बॅग व प्लॅस्टीकचे गोणीत असा एकुण १० किलो गांजा (Cannabis) मिळून आला. गांजा, मोबाईल व दुचाकीसह एकुण ८६ हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत (Material seized) करण्यात आला आहे. दोघां आरोपींना मुद्देमालासह पोलीसांनी ताब्यात घेतले. दोघांवर शिरपुर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २०(ब) व २२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई संदिप मुरकुटे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, सपोनि गणेश फड, पोसई संदिप मुरकुटे, पोकॉ नरेंद्र शिंदे, पोकॉ स्वप्निल बांगर, पोकॉ अमित रनमळे, पोकॉ भुषण कोळी यांनी केली.

Related Stories

No stories found.