धुळ्यात बेकायदेशीर टीपूचे स्मारक हटविले

शहरात शांतता राखण्यासाठी आमदारांनीच घेतली सामंजस्याची भूमिका
धुळ्यात बेकायदेशीर टीपूचे स्मारक हटविले

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरात शंभरफुटी रस्त्यावर बेकायदेशीर उभारण्यात येणारे टीपू सुलतानचे स्मारक अखेर पहाटेच्या सुमारास हटविण्यात आले. शहरात शांतता राखण्यासाठी आ.फारूख शाह यांनी सामंजस्याची भूमिका घेवून रात्रीतून कार्यकर्त्यांच्या मदतीने स्मारक हटविले.

धुळ्यात बेकायदेशीर टीपूचे स्मारक हटविले
Murder खर्चासाठी पैसे देत नसल्याने मुलांनीच बापाला संपवले

स्मारक बेकायदेशीरपणे उभारले जात असल्याने नगरसेवक सुनिल बैसाणे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेवून महापौर प्रतिभा चौधरी यांनी महापालिका प्रशासनाला स्मारक हटविण्याचे आदेश दिले होते. तसेच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देवून स्मारक हटविण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही मनपा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नगरसेवक बैसाणे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता.

यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड उपस्थित होते. यावेळी पुतळा कोण उभारत आहे? कोणत्या निधीतून उभारला जात आहे? ठेकेदार कोण? सदर जागा कोणाच्या अखत्यारित आहे आदी माहिती घेण्यात आली.

यावेळी सदर जागेबाबत मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकमेकांकडे बोट दाखविले. यामुळे आणखीनच तिढा निर्माण झाला होता. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून हे स्मारक उभारले जात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ठेकेदाराला बोलवून बेकायदेशीर स्मारक उभारल्याबाबत जाब विचारण्यात आला. सदर बेकायदेशीर स्मारकामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ पाहत आहे, त्यामुळे आमदारांनीच सदर स्मारक हटवावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेवून रात्रीतून कार्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com